digital products downloads

लातूरच्या त्या शेतकऱ्याला सोनू सूदची सर्वात मोठी मदत! म्हणाला, ‘तुम्ही नंबर पाठवा, मी तुम्हाला…’

लातूरच्या त्या शेतकऱ्याला सोनू सूदची सर्वात मोठी मदत! म्हणाला, ‘तुम्ही नंबर पाठवा, मी तुम्हाला…’

Maharashtra Farmer Latur Viral Video: 

महाराष्ट्रातील लातूरमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक शेतकरी आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःलाच नांगराला जुंपले होते. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने शेतकरी चक्क स्वतःच औत ओढत मशागत करताना दिसत आहे. झी 24 तासने ही बातमी व व्हिडिओ दाखवतच संपूर्ण महाराष्ट्राने या बातमीची दखल घेतली. कृषीमंत्र्यांनीदेखील या वृद्ध शेतकऱ्याला मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता अभिनेता सोनू सूदने देखील मदतीची घोषणा केली आहे. 

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटनासमोर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने एक वृद्ध शेतकरी चक्क स्वतःच औत ओढत शेतीची मशागत करताना दिसत आहे. हाडोळती येथील अल्पभूधारक शेतकरी मागच्या 50 वर्षापासून शेती करत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती हालकीचे असल्याने ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेती करणे अवघड झाल आहे. त्यामुळं हे पवार दाम्पत्य शेतीत कोळपणीचं काम करत आहेत. दरम्यान या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं वय 75 वर्ष आहे. मात्र हे दोघेही पती-पत्नी रात्रंदिवस शेतात राबत आहेत. तरी देखील शेती परवडत नाही. तर शासनाने कर्जमाफी करावी अशी देखील मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 

शेतकरी दाम्पत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनानेही मदतीची घोषणा केली आहे. कृषी विभागाने सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची आणि ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनेही मदतीची तयारी दाखवली आहे. सूद याने ट्विट करत मदत करण्याची इच्छा असल्याचे म्हटलं आहे.  ‘त्यांचा नंबर द्या, मी बैलांची व्यवस्था करतो’, असं ट्विट सोनू सूद याने केले आहे. 

दरम्यान, सोनू सूदच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत म्हटलं आहे की बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टर पाठवा. या वयात ते बैलगाडी कोण हाकणार? त्यावर सोनू सूदने उत्तर दिलं आहे की, आपल्या शेतकरी बांधवाला ट्रक्टर कसे चालवायचे माहिती नाही. त्यामुळं बैलच ठिक आहेत. त्याचबरोबर कृषी अधिकाऱ्यांनीही सोनू सूदचे आभार मानले असून पुढे म्हटलं आहे की, शेतकरी दाम्पत्यासाठी कृषी विभागाने एक ट्रॅक्टर आणि 1.25 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp