
Latur Crime News: लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन सुनेने सासूला आमानुषपणे मारहाण केली आहे. ही सर्व घटना व्हिडिओत कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच, या सुनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावातील प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतीच्या किरकोळ कामावरुन सासू आणि सुनेमध्ये वाद झाले होते. त्यानंतर सुनेने सासुला अमानुष मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेने याआधीदेखील सासूला मारहाण केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सुनेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, सून वृद्ध महिलेचे केस ओढत, तिला जमिनीवर फरफटत नेताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचे दृश्य दिसत आहे.विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना समोर येऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असला तरी ZEE 24 TAAS या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
Latur News | 70 वर्षीय सासूला सुनेकडून बेदम मारहाण, लातूरमधील अमानुष घटनेचा व्हिडिओ व्हायरल#Zee24Taas #Marathinews #latur #laturnews #maharashtranews pic.twitter.com/D371oZm9LP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 13, 2025
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथेही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. सीसीटिव्हीत, एक महिला वृद्ध महिलेला मारहाण करताना दिसत आहे. 1 जुलै रोजीची ही घटना असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली आहे. आकांक्षा असं सुनेचे नाव असून ती सासू सुदेशा देवी हिला जबरदस्ती हाताला धरून पायऱ्यांवरुन खेचत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. इतकंच नव्हे तर, आकांक्षाची आईदेखील तिला थांबवण्याच्या ऐवजी मदत करताना दिसत आहे. सुदेशा देवी यांनी अनेकदा आकांक्षाविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.