
Lalbaugcha Raja immersion: मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती असलेल्या लालबागचा राजाची विसर्जन यात्रा ही देशातील सर्वात लांब आणि भव्य यात्रेंपैकी एक आहे. ही यात्रा सुमारे 20-25 तास चालते आणि रविवारी सकाळपर्यंत गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. त्यानंतर, त्यांचे पूर्ण थाटामाटात आणि भक्तीने विसर्जन केले जाईल. मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ, लालबागचा राजा, लोकांच्या श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. लालबाग परळ परिसरात असलेले हे पंडाल दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी जगभरातील भाविकांना आकर्षित करते. येथे भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येतात. लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता लालबागचा राजा उत्सव मंडळाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
‘आम्ही 10-15 मिनिटे उशीरा आलो’
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मानद सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विसर्जन मिरवणूक 24 तास चालली. दुपारनंतर मुंबईत पाऊस परतला. भरती लवकर आली. राजाचे विसर्जन भरतीवर अवलंबून असते. ओहोटीवेळी आम्ही तराफ्यावर घेतो आणि तराफा भरतीवेळी जातो आणि विसर्जन होतं. उशीरा झालेल्या विसर्जनाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले. भरती लवकर आली आणि आम्ही 10-15 मिनिटे उशीरा आलो. सर्व पोलीस, पालिका कर्मचारी यांनी सहकार्य केल्याचे ते म्हणाले.
‘शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन’
आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण आहे. आम्ही नियोजन करतो. शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही विसर्जन करतो. नवीन तराफा आम्ही बनवलाय. कोळी बांधव आमच्या सोबत आहेत. तांत्रिक अडचण नव्हती. तूफान पाऊस पडतोय म्हणून भरती आली. म्हणून मंडळाने विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सुधीर साळवी म्हणाले.
कोळी बांधवांची काय प्रतिक्रिया?
गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी यासंदर्भात व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. अनेक वर्ष झाली आम्ही लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलेलो आहोत. काही कारणांमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन झालेलं नाही. ओहोटी आणि भरतीचा अंदाज लालबाग मंडळाला आला नाही. आता आम्ही विसर्जन करत नाही कारण मंडळाने आता गुजरातच्या तरफामार्फत विसर्जन करतात, असे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले. लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा तयार केला, पण भरती-आहोटीचं ज्ञान नसल्यामुळे बाप्पा तराफ्यावर बसूच शकले नाहीत.मुंबईतील इतर गणेश मूर्तींचं विसर्जन आजही कोळी समाजाने यशस्वीपणे पार पाडलं—कारण समुद्र आमचा आहे, आणि श्रद्धा आमच्या रक्तात असल्याची प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली. 1934 मध्ये नवस फळल्यावर कोळी समाजानेच पहिला गणपती बसवला, आणि आज त्याच समाजाला विसर्जनाच्या वेळी बाजूला केलं जातं? ही केवळ विस्मृती नाही—ही अपमानाची गोष्ट आहे. निसर्गानेच जणू आयोजकांना चोख उत्तर दिलं.भर समुद्रात राजा वाट पाहत होता. आता तरी मंडळाने शहाणपणा दाखवावा आणि दरवर्षीप्रमाणे कोळी समाजाला विश्वासात घेऊन राजाचं विसर्जन विधिवत आणि सन्मानाने पार पाडावं. कोळी समाज म्हणजे विसर्जनाची परंपरा, श्रद्धेचा पाया आणि समुद्राचा खरा राजा, असल्याची प्रतिक्रियाही कोळी समाजाकडून देण्यात आली आहे.
FAQ
लालबागचा राजाचे विसर्जन का उशीरा झाले आणि त्यासाठी कोणते कारणे जबाबदार आहेत?
उत्तर: लालबागचा राजाचे विसर्जन उशीरा झाल्याचे कारण दुपारी मुंबईत पुन्हा पाऊस आणि अपेक्षेपेक्षा लवकर आलेली भरती आहे. मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले की, ओहोटीच्या वेळी तराफ्यावर मूर्ती ठेवली जाते आणि भरतीवर अवलंबून विसर्जन होते. मात्र, १०-१५ मिनिटे उशिरामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे (तुफानी पाऊस आणि भरतीचा अंदाज चुकल्याने) विसर्जन थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
कोळी समाजाचा लालबागच्या राजाच्या विसर्जनात काय सहभाग आहे आणि त्यांची नाराजी का आहे?
उत्तर: १९३४ मध्ये कोळी समाजाने नवस फळल्यावर लालबागचा राजा हा गणपती बसवला आणि अनेक वर्षे विसर्जनाची परंपरा सांभाळली. मात्र, मंडळाने आता अत्याधुनिक तराफ्याचा वापर सुरू केल्याने आणि भरती-आहोटीचा अंदाज चुकल्याने त्यांना बाजूला ठेवण्यात आले. नाखवा हिरालाल वाडकर यांनी याला अपमानाची गोष्ट म्हणून निदर्शनास आणले, कारण कोळी समाज समुद्र आणि विसर्जन परंपरेचा आधार आहे.
विसर्जन प्रक्रियेत कोळी समाजाला पुन्हा कसे सामील करता येईल?
उत्तर: कोळी समाजाच्या मते, मंडळाने शहाणपणा दाखवून त्यांचा सहभाग घ्यावा. त्यांचे समुद्राबद्दलचे पारंपरिक ज्ञान आणि अनुभव वापरून विसर्जन शास्त्रोक्त आणि सन्मानाने पार पाडता येईल. मंडळाने दरवर्षीप्रमाणे त्यांना विश्वासात घेतल्यास निसर्गाच्या अडचणी टाळता येतील आणि विसर्जनाची परंपरा कायम राहील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.