
गणेशोत्सवात मुंबईतील लालबागच्या राजाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईचा राजा, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. उद्या, बुधवार, २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर
.
लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पूजा उद्या पहाटे ५ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पार पडेल. त्यानंतर, पहाटे ६ वाजता लालबागचा राजाचे दर्शन सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येईल. हा गणेशोत्सव बुधवार, २७ ऑगस्टपासून सुरू होऊन शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
पूर्वसंध्येलाच भाविकांची गर्दी
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासूनच भाविकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मंगळवारी दुपारपासूनच मोठ्या संख्येने भाविक दर्शनाची वाट पाहत बसलेले दिसून आले. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह संचारलेला आहे.
मीडियासाठी विशेष व्यवस्था
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव सर्व मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने लाईव्ह कव्हरेज करत असतात. या सर्व प्रतिनिधींना मीडिया बॅाक्स मधून लाईव्ह कव्हरेज करता येणार आहे. त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग पोलिस चौकी येथून चालत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार मार्गे मीडिया बॅाक्स पर्यंत सर्व मीडिया प्रतिनिधींसाठी येण्या-जाण्याचा मार्ग नियोजित करण्यात आला आहे.
लालबागच्या राजाचा भव्य गणेशोत्सव सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून साजरा केला जाईल, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २७२ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
दरम्यान, यावर्षी लालबागच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या १ कोटींहून अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी यंदा लालबागच्या राजाच्या परिसरात २७२ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे सामान्य नसून, ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या कॅमेऱ्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ चित्रीकरण करत नाहीत. तर, गर्दीच्या परिस्थितीचे आणि संशयास्पद हालचालींचे रिअल-टाइममध्ये विश्लेषण करून तात्काळ पोलिसांना अलर्ट पाठवतात. यामुळे संभाव्य धोके किंवा सुरक्षेच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देणे पोलिसांसाठी सोपे होणार आहे, ज्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षा अधिक प्रभावी होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.