
गणेशोत्सवाच्या उत्साहातच मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ शैलू वजणदार (वय 11) गंभीर
.
शनिवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर दोन्ही भावंडं झोपली होती. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले आणि कोणतीही मदत न करता चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
चालक झाला फरार
मिळालेली अधिक माहिती अशी की, हा घटना पहाटे अंदाजे चारच्या दरम्यान घडली. ही दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. भरधाव येणाऱ्या वाहनचालकाने थेट या मुलांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर तिथे मदत न करता त्या वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. लालबाग राजाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असल्याने लोकांची मोठी गर्दी तिथे होती. अनेकांनी पुढे येत या दोन चिमुकल्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघातप्रकरणी अधिकचा तपास करताना दिसत आहेत.
दरम्यान, लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. लालबाग मार्केट, चिंचपोकळी स्टेशन आणि भायखळ्यातील हिंदुस्तान मशिदीतून बाप्पाचे स्वागत करत ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली. पहाटेच्या वेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात राजाचे विसर्जन करण्यात आले.
मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु
मुंबईतील मानाचा गणपती असलेल्या मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईकर हजारोंच्या संख्येने विसर्जन मार्गावर गर्दी करुन थांबले आहेत.
मुंबईत काय व्यवस्था आहे?
- गणपती घेऊन जाणारी वाहने वाळूमध्ये अडकू नयेत यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर 1,175 स्टील प्लेट्स बसवण्यात आल्या.
- मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सुमारे 50 जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
- विसर्जन स्थळांवर 245 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच, 42 क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत.
- जलाशय आणि कृत्रिम तलावांवर 2,178 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
- बचाव आणि मदत कार्यासाठी 56 मोटरबोटची व्यवस्था करण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.