digital products downloads

लासूर बाजारातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना सुविधा देऊ- सभापती: कविता चव्हाणांनी भाजीपाला खरेदी करताना साधला नागरिकांशी संवाद‎ – Chhatrapati Sambhajinagar News

लासूर बाजारातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना सुविधा देऊ- सभापती:  कविता चव्हाणांनी भाजीपाला खरेदी करताना साधला नागरिकांशी संवाद‎ – Chhatrapati Sambhajinagar News



प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, पती रवींद्र चव्हाण हे रविवारी (२९ मार्च) लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करताना दिसले. त्यांनी स्थानिक दुकानदारांशी संवाद साधला. भाजीपाला खरेदी केली. सभापती बाजारात खरेदी करताना दिसल्याने नागरिक, शेतकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. या वेळी चव्हाण यांनी बाजारकरूंना योग्य त्या सुविधा देऊ, असे आश्वासन दिले. कविता चव्हाण म्हणाल्या, सभापती झाल्यानंतरही बाजारात भाजीपाला खरेदी करणे आमच्यासाठी वेगळे नाही. लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात दर रविवारी मी किंवा माझे पती भाजीपाला खरेदीसाठी येतो. हे बाजारातील भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना माहीत आहे. आम्ही शेतकरी आहोत. कितीही मोठ्या पदावर गेलो तरी सामान्य जीवन सोडणार नाही. शेतकरी, सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणे हा आमचा स्थायीभाव आहे. तो कायम टिकवू. कविता चव्हाण, रवींद्र चव्हाण यांनी बाजारात शेतकरी, व्यापाऱ्यांशी अडचणींबाबत चर्चा केली. शेतकरी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीमार्फत जे शक्य आहे ते केले जाईल, असे त्यांनी सांगितले. आठवडी बाजारात चोरीच्या घटना घडतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेला सजग राहण्याबाबत सूचना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश देणार लासूर स्टेशनच्या आठवडी बाजारात आसपासच्या ५० गावांतील शेतकरी भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येतात. नागरिकही येतात. त्यांच्यासाठी बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले जातील, असे सभापती कविता चव्हाण यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp