
साेशल मिडियावरील लिंकडेन या वेबसाईटच्या माध्यमातून आेळख निर्माण झालेल्या एका तरुणाने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसठाण्यात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुज माकीन (रा. जबलपूर, मध्य प्र
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तनुज यांची लिंकडेन लिंकच्या मध्यमातून आेळख निर्माण झाली होती. त्यानंतर तरुणी आणि आरोपी तनुजचे बाेलणे वाढून त्यांच्यात मैत्री झाली. तनुजने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला हडपसर भागातील एका फ्लॅटवर बाेलवले आणि त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर तरुणीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझ्याबरोबर विवाह करायचा असेल तर तुझी छायाचित्रे पाठवून दे’, असे त्याने तिला सांगितले. तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणे बंद केले.तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने ‘माझा नाद सोड नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना जिवे मारू’, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक एस जगदाळे पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा जेरबंद
14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी आराेपींना अटक केली. संदीप रवींद्र पाटील (वय 20), साहिल संतोष साळवे (वय 19, दोघे रा. मानाजीनगर, नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपीची नावे आहे. याबाबत पीडित मुलीच्या 43 वर्षीय आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पाटील आणि साळवे यांनी संबंधित पिडित 14 वर्षीय मुलीशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी मुलीला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यास आई आणि भावाला जिवे मारू, अशी धमकी देखील आराेपींनी दिली. पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.