
Medical News Nagpur: नागपूरमध्ये लिंग पुनर्रचनेची म्हणजेच लिंग रिकन्ट्रक्शनची मध्य भारतामधील पहिली शस्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे. नागपूरमधील एका तरुणाला आठ वर्षांपूर्वी कर्करोगाचा संसर्ग झाल्याने लिंग गमवावे लागले होते. या तरुणावर शस्रक्रिया करुन त्याचे लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करण्यात आलं आहे. ही दुर्मिळ शस्रक्रिया साडेनऊ तास चालली. ही शस्रक्रिया यशस्वी झाली असून यामुळे तरुणाला नवं आयुष्य मिळाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
आठ वर्षांपासून सुरु होता संघर्ष
गुप्तांगाला झालेल्या जखमा किंवा इजा या सामान्यपणे वैद्यकीय उपचारांनतरही पूर्णपणे बऱ्या होण्यास अधिक कालावधी घेतात. असाच काहीसा प्रकार नागपूरमधील या रुग्णाबरोबर घडला. आठ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे या तरुणाने लिंग गमवलं होतं. तेव्हापासूनच त्याच्यावर वेळोवेळी वेगवेगळे उपचार सुरु होते. अखेर त्याच्या समस्येवर डॉक्टरांनी कायमस्वरुपी उपचार करत त्याला जीवनदान दिलं आहे.
दोन वेगवेगळ्या संस्थांमधील तज्ज्ञांनी एकत्र येत केली शस्रक्रिया
दोन वेगवेगळ्या संस्थांमधील तज्ज्ञांनी एकत्र येऊन ही साडेनऊ तासांची शस्रक्रिया केली. एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय आणि लता मंगेशकर हॉस्पिटल येथील प्लॅस्टिक सर्जरी विभागातील तज्ज्ञांनी संयुक्तरित्या ही शस्रक्रीया केली. लिंगाची रचना करण्यासाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्गाची (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली. नंतर हे जघन भागात लावण्यात आले. ही संपूर्ण शस्रक्रीया एकाच टप्प्यात करण्यात आली हे ही विशेष!
या अशा शस्रक्रियांमध्ये सर्वात कठीण कामं कोणतं असतं?
या शस्रक्रियेसंदर्भात बोलताना डॉ अभिराम मुंडले यांनी ती किती कठीण होती याबद्दलची माहिती दिली. “दोन मिलिमीटरच्या अती सूक्ष्म रक्तवाहिन्या म्हणजेच लहान धमण्या आधी शिरा जोडणे हे शस्रक्रियेतील सर्वात गुंतागुतींचा भाग होता. या शिरा आणि धमण्यांचा व्यास अवघा 1 ते 6 मिलीमीटर एवढा असतो,” असं डॉ. मुंडले म्हणाले.
अशा शस्रक्रियांचा या रुग्णांनाही फायदा होऊ शकतो
अशा शस्रक्रियांना वैद्यकीय भाषेमध्ये ‘मायक्रोव्हस्क्युलर ऑपरेशन्स’ असं म्हणतात. या शस्रक्रिया साध्या नजरेनं करणं कठीण असल्याने डॉक्टर अशा शस्रक्रियांदरम्यान अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोपचा वापर करतात. कर्करोगाशिवाय अशा पुनर्रचनात्कम प्रक्रियेचा वापर ट्रॉमिक म्हणजेच अपघातानंतर लिंग विच्छेदन आणि लिंग बदल शस्रक्रियेमध्येही करता येऊ शकतो. डॉ. सजल मित्रा यांनी,अपघाती लिंग विच्छेदन आणि लिंग बदल शस्रक्रियांच्या रुग्णांचा या अशा सुविधा फायद्याच्या ठरु शकतात असं सांगितलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.