
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऐकोणचाळीस वर्षांपूर्वी लेंडी प्रकल्पाचा नारळ फोडण्यात आला होता. परंतु तो अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. एखाद्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडल्यानंतर तो पूर्
.
अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी मुखेड तालुक्यातील चव्हाण वाडी येथे शेषराव चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी लेंडी प्रकल्पासह मनार धरण, गोदावरी मन्यार साखर कारखाना व इतर रखडलेली प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
ऐकोणचाळीस वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्पाचा नारळ फोडण्यात आला होता. शंकरराव चव्हाण यांच्या काळात याचे भूमिपूजन झाले. परंतु तो अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. दोन राज्यातील आंतरराज्य असलेला हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. एखाद्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडल्यानंतर तो पूर्ण व्हायला चाळीस वर्ष लागतात हे आमच अपयशच म्हणावे लागेल, असे अजित पवार म्हणाले. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरच लेंडी प्रकल्पातील अडथळे दूर करुन तो पूर्ण करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
आता आपण या प्रकल्पाचे रखडलेले काम सुरू केले आहे. हे करत असताना अनेकांनी मला निवेदन दिले आहे. पुनर्वसनाचा प्रश्न व इतर जे काही मुलभूत प्रश्न आहेत ते सोडवले जातील. मी अर्थमंत्री आहे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, विखे पाटील यांच्याशी बोलून तुम्हाला मदत करेल, काळजी करू नका. मनारसाठी याच महिन्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. नारळ फोडल्यानंतर एखाद्या प्रकल्पाला चाळीस वर्ष लागतात हे आमचे अपयशच आहे. गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी आणण्याची योजना आपण राबवतोय. 54 टीएमसी पाणी आणून 2 लाख 40 हजार हेक्टर भागाला याचा लाभ होईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
पाकिस्तानला त्यांच्या भागात घुसून धडा शिकवला
अजित पवार यांनी यावेळी भारत पाकिस्तान तणावावर भाष्य केले. संकट येत असतात, आताही पाकिस्तानने आपल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. आपण ऑपरेशन सिंदूरमधून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करतो. मोदीजींनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि आपण पाकिस्तानला त्यांच्या भागात घुसून धडा शिकवला, असे ते म्हणाले.
सरकार शहीद जवानांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे
नांदेड जिल्ह्यातील सचिन वंजे हे वीर जवान नुकतेच काश्मीरमध्ये शहीद झाले, देगलुर तालुक्यातील ते रहिवासी होते. त्यांना मी अभिवादन करतो. शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये, रमाई घरकुल योजनेतून घर देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वंजे यांच्या पत्नीच्या नोकरीसाठीही प्रयत्न करणार आहे. शहीद जवानांच्या कुटुंबाच्यापाठीशी सरकार सदैव खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
पक्षात प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल
पक्षप्रवेश होत असल्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढते आहे. शेषराव चव्हाण यांना राजकारणात कोणतेही मोठे पद मिळाले नाही, पण ते कधी नाराज झाले नाही. उदय चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे नातू आहेत. त्यांनी पक्षात प्रवेश केला त्याचाही फायदा आपल्या पक्षवाढीसाठी होणार आहे. ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्या सगळ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाईल, पक्षात प्रत्येकाचा योग्य सन्मान राखला जाईल, तुम्हाला पश्चाताप होणार नाही. जुन्यांचाही पक्षात योग्य मान राखला जाईल. जुन्या-नव्यांची सांगड घालून झपाटून काम करावे लागेल. मग यश मिळाल्याशिवाय राहणार नाही,
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.