
Kunal Kamra Gets Huge Donations: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कुणाल कामरा विरोधात शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम 353 (b) 1 म्हणजेच, सोशल मीडियावर खोटी बातमी पसरवणे व समाजात अशांती पसरवणे, कलम 352 (2) दोन गटांमध्ये वैर निर्माण करणे तथा शांतता भंग करणे, 356 (2) प्रतिष्ठत व्यक्तीची बदनामी करणे अशी कलम लावण्यात आली आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास आर्थिक दंड व साधा कारावास शिक्षेची तरतूद असल्याने कुणालच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे कुणाल कामरासाठी आता त्याचे समर्थक पुढे सरसावले असून त्याला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत मागील काही दिवसांमध्ये मिळाली आहे.
कोट्यावधी रुपयांची मदत
कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. एकीकडे कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात आहे. याचवेळी कुणालच्या कायदेशीर लढ्यासाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असून दोन दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. कुणालने महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र- भारतासह इतर देशांतील चाहतेही व्यक्त करीत आहेत. याचवेळी कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा तुफान ओघ सुरू झाला आहे. या मदतीच्या रूपात दोन दिवसांत कुणालच्या खात्यात तब्बल 4 कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पदेशी चलनामध्येही मिळाली मदत
कुणाल कामराच्या युट्यूब अकाऊंटवरील व्हिडीओखाली कमेंटमध्ये अनेकांनी त्याला पैसे पाठवत असल्याचं म्हटलं आहे. भारतीयांनी 400 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतची मदत कामराला पाठवली आहे. केवळ भारतच नाही तर संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेमधूनही कुणाल कामराला मोठी मदत केली जात आहे.
‘टी-सीरिज’ने घेतला आक्षेप
कुणाल कामरा याने गायलेल्या विडंबन गीतावरून राजकीय वातावरण तापले असताना या प्रकरणात प्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही वादात उडी घेतली आहे. ‘टी-सीरिज’ने कुनाल कामराला नोटीस पाठवली असून आपला मालकी हक्क असलेलं गाणं कुणालने परवानगीशिवाय वापरल्याचा ठपका ‘टी-सीरिज’ने ठेवला आहे. या दाव्यावर कुणालने आपल्या एक्स अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. “नमस्कार, ‘टी-सीरिज’ तुम्ही चमचागिरी करणं बंद करा. पॅरोडी आणि सटायर हे कायदेशीररित्या फेअर युज अंतर्गत येतात. मी तुमच्या गाण्याचे मूळ बोल किंवा संगीत वापरलेले नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर प्रत्येक गाणं /डान्स व्हिडिओ काढावा लागेल. सर्व डिजीटल निर्मात्यांनी कृपया याची नोंद घ्यावी. तरीही, भारतातील प्रत्येक एकाधिकारशाही ही माफियांपेक्षा कमी नाही, म्हणून हा खास व्हिडिओ काढला जाण्यापूर्वी पाहा/डाउनलोड करा,” असं कुणाल कामरा म्हणाला आहे. तसेच या पोस्टच्या शेवटी त्याने उपरोधकपणे, “सूचना – टी-सीरीज, मी तमिळनाडूत राहतो,” असंही म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.