
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जीएसटी कपात केल्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जीएसटी कमी करता येत होता, तर केंद्राने मागील 8 वर्षांत तो कमी का केला नाही? हे सरकार लोकांना लुटून
.
केंद्र सरकारने जीएसटीच्या आघाडीवर अनेक महत्वपूर्ण बदल केलेत. या बदलांतर्गत सरकारने 12 व 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णतः रद्दबातल केला आहे. आता केवळ 5 व 18 टक्क्यांचा स्लॅब आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक जिवनावश्यक वस्तू स्वस्त होतील असा दावा केला जात आहे. नवे निर्णय आगामी सनासुदीच्या तोंडावर म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
जनतेकडून जादा कर वसूल का केला?
विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सरकार जेव्हा लोकांवर अन्यायकारक जीएसटी लादत होते, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला आणि विरोध केला. जीएसटी कर कमी करावा, त्यावर Cap लावावी ही मागणी विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी गेले आठ वर्ष सातत्याने करत होते. निवडणुकीत फटका बसेल या भीतीने या सरकारने जीएसटी आज कमी केला आणि त्याचे श्रेय पण केंद्र सरकारला घ्यायचे आहे? गेली आठ वर्ष लोकांना लुटले त्याची जबाबदारी सरकार घेणार का?
जर जीएसटी कमी करता येत होता तर तो गेली आठ वर्ष का कमी केला नाही, याचे उत्तर सरकार देणार का? जनतेकडून ज्यादा टॅक्स वसूल का केला याचे उत्तर आधी द्यावे मग सरकारने श्रेय घ्यावे. लोकांना लुटले आणि आज दिवाळी साजरी करत आहेत, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी जीएसटीच्या मुद्यावर यापूर्वी केलेल्या ट्विटचे स्क्रिनशॉटही पोस्ट केलेत.
पेट्रोल – डिझेल जीएसटीत आणा – दानवे
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी केंद्रावर निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणी इंधनदरात सवलत देण्याची मागणी करत पेट्रोल व डिझेलही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज व्यक्त केली आहे. सात – आठ वर्षे जीएसटीच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता बदल करण्याचे केंद्राला सुचले आहेत. हरकत नाही.
मात्र, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारं तयार नाहीत. मात्र गेल्या ३९ महिन्यांत रशियाकडून तेल घेऊन देशातील तेल कंपन्यांचे १२.६ बिलियन डॉलर्स वाचले आहेत. यातील कणभराचा रिलीफ हा सामान्य माणसाला मिळालेला नाही. आमची मागणी आहे, इंधनही कमी करा, पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या खाली आणा. सामान्यांना दिलासा द्या, असे ते म्हणालेत. दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये एक तळटीपही टाकली आहे. त्यात त्यांनी सत्ताधारी पक्षांची री ओढणाऱ्यांनी येथे पांचट आणि बेसंबंध कमेंट्स टाकून नये. त्याने इंधनात सूट मिळत नसते, असे म्हटले आहे.
हे ही वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



