digital products downloads

लोणावळ्यातील सर्वात फेमस ठिकाणी विचित्र अपघात! 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू; बॅग सापडल्यानंतर साडेदहा तासांनी…

लोणावळ्यातील सर्वात फेमस ठिकाणी विचित्र अपघात! 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू; बॅग सापडल्यानंतर साडेदहा तासांनी…

Pune Lonavala Trekker Death: लोणावळ्याजवळ एक धक्कादायक अपघात घडला असून यामध्ये एक 19 वर्षीय तरुणीचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉईंटजवळ घडला आहे.

Add Zee News as a Preferred Source

390 फूट खोल दरीतून काढला मृतदेह

लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत घडलेली ही घटना प्रत्येकाला सुन्न करणारी आहे. मुंबईहून ट्रेकसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धोकादायक दरी, अंधार आणि वेळेशी झुंज देत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.

मृत मुलीची ओळख पटली

31 जानेवारी रोजी मुंबई येथील श्रेया पती (वय 19) ही तरुणी लोणावळ्याला ट्रेकसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ट्रेक करण्यासाठी ती गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. रात्री नातेवाईकांनी शोध घेत लोणावळ्यात चौकशी केली. त्यावेळी ती परिसरात आलेली होती व परत गेल्याची माहिती मिळाली. 

आधी बॅग सापडील अन् नंतर…

1 फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रेया बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी 11.30 वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी अडीच वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू असतानाच दुपारी पावणेपाच वाजता सुमारे 390 फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला.

सात तासानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री साडेनऊ वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. म्हणजेच तिची बॅग सापडल्यानंतर साडेदहा तासांनी तिचा मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

ट्रेकिंगच्या नावाखाली हल्ली अनेकजण भटकंतीसाठी जातात. मात्र दरी-डोंगरांमध्ये फिरताना परिसराची माहिती असणे, सुरक्षा उपकरणे आणि इतर गोष्टींची काळजी घेणंही आवश्यक असतं. तसेच त्या दिवशी तिथे हवामान कसे असेल, स्थानिकांची मदत घेणे यासारख्या गोष्टींचाही विचार ट्रेकिंगला जाताना केला पाहिजे असं सुचवलं जातं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp