
.
विळद येथीलखोपेश्वर महिला शेतकरी बचत गटातील महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाबरोबर बियाण्यांची पूजा करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन बळीराजाचा आर्थिक स्तर उंचावून लहरी वातावरणापासून शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवावे, अशी प्रार्थना केली.
कृषि विभागामार्फत तुर व सोयाबीन आंतरपिक प्रात्यक्षिक प्रकल्प राबवला जात आहे. प्रात्यक्षिकासाठी वेळेत बियाणे उपलब्ध झाले व मुहुर्त साधण्यासाठी खोपेश्वर महिला शेतकरी गटाने वडाबरोबर बियाणेचीही पुजा करण्याचे ठरवले. यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी कविता मदने यांनी बियाणे उगवन क्षमता चाचणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक करुन दाखवले. जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्प महाडीबीटीवर नोंदणी केलेल्या शेतकरी गटांसाठी राबवले जात आहेत. यावेळी मंडळ कृषि अधिकारी माधवी घोरपडे यांनी खरीप मोहिमा व लागवड तंत्रज्ञान विषयी माहिती दिली. उप कृषि अधिकारी विजय सोमवंशी यांनी फळबाग लागवड योजना, महाडीबीटी रजिस्ट्रेशन बाबत माहिती दिली. यावेळी गटाचे अध्यक्षा वैशाली वाळके, सचिव अर्चना आडसुरे, सुरेखा आंबेकर, कांताबाई कोळेकर, वैशाली गायकवाड, सिमा जगताप, पौर्णिमा पवार, सत्यशीला आडसुरे, रत्नमाला वाळके, उषा वाळके, प्रियंका निमसे आदी उपस्थित होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.