
अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला पाहावयास मिळत आहे. पाण्याअभावी वडजी (ता.पैठण) येथील एका शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी लावलेली मोसंबीच्या ५०० झाडांवर जेसीबी फिरवला आहे.
.
वडजी येथील किशोर गोजरे यांनी तीन एकर शेतात मोठ्या कष्टाने मोसंबी लावली होती. मेहनत करुन मोसंबीची रोपे वाढवली. २०२० पासून या बागेतून त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली होती. यंदा मात्र पाणीटंचाईने डोकेवर काढले आणि पाण्याअभावी सर्व बाग वाळून गेली होती. मोठ्या आशेने त्यांनी २०१५ मध्ये तिन्हीही एकरात मोसंबीचा बाग लावला होता. उधार उसनवारी करुन यासाठी त्यांनी भांडवल उभारले होते. तळहातावरील फोडाप्रमाणे झाडांना वाढवले. दहा वर्ष मेहनत घेतल्यानंतर या झाडांना फळे लागली आणि गोजरे यांचे स्वप्न वास्तवात आले. तिन चार हंगामात त्यांनी जवळपास दोन अडिच लाख रुपये उत्पन्न घेतले.
यंदा फळधारणा चांगली होती. मात्र पाणीटंचाईने डोकेवर काढले. गतवर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे नदी नाले कोरडेठाक पडली आहेत. भुजलपातळी खाली सरकली. परिणामी विहिरीने तळ गाठले. किशोर गोजरे यांचे डोळ्यासमोर संपूर्ण मोसंबीचा बाग उपटून टाकला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.