
Harshada Bhapkar: अतिवृष्टीने फक्त मराठवाडाच नाहीतर नगर जिल्ह्यातही अतोनात नुकसान केलंय.शेवगाव तालुक्यात गावंच्या गावं पाण्याखाली गेली होती.सालवडगाव ही त्यापैकीच एक.त्याच गावातून पुण्याला एमएससी करायला आलेल्या हर्षदा भापकरची शेतीही पाण्याखाली गेलीय.त्यामुळे पुढील शिक्षण कसं पूर्ण करायचं या विवंचनेत हर्षदा सापडलीय.
पुण्यातल्या एसपी कॉलेजला एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिकणारी ही हर्षदा भापकर कॉलेजला आलीय खरी.पण तिचं सारं चित्तं हे गावाकडं लागलंय.कारण शेवगाव तालुक्यातलं सालवडगाव देखील पुराच्या पाण्याखाली गेलं होतं.त्यात हर्षदाच्या वडिलाची 3 एकर शेतीही ही पाण्याखाली आहे. कपाशीचं पिकं पुराच्या पाण्यात वाहून गेलंय.
घरातून पैसे येणार नाही. त्यामुळे कॉलेजचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत हर्षदाला सापडलीय. शेतातली सगळी कपाशीची बोंडं काळी पडून गेलीत. त्यामुळे गावाकडून वडिल शिक्षणासाठी पैसे पाठवणार तरी कसे याची चिंता तिला सतावतेय.पण शिक्षणही मधून सोडावसं वाटत नाही म्हणून मग हर्षदा आता कमवा शिकवा योजनेसाठी प्रयत्न करतोय पण त्यातूनही महिना कसा भागवायचा? असा यक्ष प्रश्न तिच्यासमोर आहेच हे…
पुण्यात उच्चशिक्षण घेत असलेल्या या हर्षदा भापकरला प्रेक्षकहो तुम्ही थेट तिच्या बँक अकाऊंटवर मदत करू शकता. हर्षदाचे डिटेल्स पुढीलप्रमाणे आहेत.
नाव : भापकर हर्षदा ज्ञानेश्वर
स्थायी पत्ता : सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
सध्याचा पत्ता : नारायण पेठ, पुणे
महाविद्यालय : एस. पी. कॉलेज, पुणे.
शिक्षण : एम.एस्सी. द्वितीय वर्ष
खाते क्रमांक : 60382866045
IFSC कोड : MAHB0001104
मासिक खर्च : 7000
शेतीचे नुकसान : 3 एकर
वार्षिक उत्पन्न : 42000
Phone pay : 9322172283
FAQ
प्रश्न: हर्षदा भापकर कोण आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे?
उत्तर: हर्षदा भापकर हे शेवगाव तालुक्यातील सालवडगाव गावातील शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. ते पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये एमएससीच्या दुसऱ्या वर्षी शिकत आहेत. अतिवृष्टीमुळे गावातील शेती पाण्याखाली गेल्याने वडिलांची ३ एकर कपाशीची शेती नष्ट झाली आहे. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या हर्षदाला शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले असून, त्या कमवा-शिका योजनेकडे वळल्या आहेत.
प्रश्न: अतिवृष्टीमुळे भापकर कुटुंबावर काय परिणाम झाला आहे?
उत्तर: नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे गावे पाण्याखाली गेली. सालवडगावमधील भापकर कुटुंबाची ३ एकर शेती पूर्णपणे वाहून गेली. कपाशीची बोंडे काळी पडून पिके नष्ट झाली असल्याने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न थांबले आहे. घरातून शिक्षणासाठी पैसे येणार नसल्याने हर्षदाला पुण्यातील खर्च भागवण्याची चिंता सतावत आहे.
प्रश्न: हर्षदा भापकर यांना शैक्षणिक खर्चासाठी किती मदत आवश्यक आहे आणि कशी मदत करता येईल?
उत्तर: हर्षदाला पुण्यातील कॉलेजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. अतिवृष्टीमुळे कुटुंबाचे उत्पन्न थांबले असल्याने त्या विवंचनेत आहेत. प्रेक्षकांना थेट तिच्या बँक खात्यात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हर्षदाचे बँक खाते तपशील मजकुरात दिलेले आहेत, ज्यामार्फत तुम्ही आर्थिक आधार देऊ शकता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.