
पुण्याच्या नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रकच्या मधोमध एक कार सापडल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील प्रवासी मयत स्वाती संतोष नवलकर, वय 37 वर्ष, शांता दत्तात्रय दाभाडे वय 54 वर्ष, दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वय 58 वर्षे या एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत 3 वर्षींची त्यांच्या शेजारी राहणारी मुलगी मोक्षिता हेमकुमार रेड्डी होती. ही मुलीग आपल्या आईच्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. तिने देखील या अपघातात आपले प्राण गमावेल आहे.
नवलकर कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, स्वाती नवलकर यांच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला होता. यामधून ते सुखरुप वाचावेत आणि चालू लागावेत यासाठी त्यांनी 5 गुरुवार केले होते. अपघात झाला तो शेवटचा पाचवा गुरुवार होता. त्या नारायणपुरवरुन दत्तांचे दर्शन घेऊन घरी परतत होते. त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा देखील वाढदिवस होता. अशातच त्यांच्या अपघाताचा बातमी समोर आली.
ट्रक चालकाचा मृत्यू
धनंजय कुमार कोळी वय तीस वर्ष राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे मुळगाव जयसिंगपूर कोल्हापूर येथील आहेत. हा अपघात एवढा भीषण होता हे त्याच्या समोर येणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंमधून पाहता येऊ शकते.
कुठे घडला हा अपघात?
पुण्यातील नवले पुलावर जवळपास 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 20 जण जखमी झाले आहे. अनियंत्रित ट्रक जवळपास 20 वाहनांना टक्कर देत हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन ट्रकमध्ये एक कार चिरडली आहे. ज्या कारने पेट घेतला ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला.
बर्निंग ट्रकचा थरार
वृत्तानुसार, साताराहून मुंबईला जाणाऱ्या राजस्थान नोंदणी क्रमांकाच्या एका भरलेल्या ट्रकचे अचानक नियंत्रण सुटले. ट्रक सुमारे एक किलोमीटरपर्यंत धावत राहिला आणि वाटेत कंटेनर, टेम्पो, मिनीबस, कार, दुचाकी आणि इतर अनेक लहान वाहनांना धडकला. असे मानले जाते की पुलावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



