
बाहेर जिल्ह्यातील आरोपी हा वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात भाडेतत्त्वावर राहून, त्याने तिघांची मदत घेऊन चक्क बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरु केले होता. त्या नोटा चलनात आल्या आणि त्यांचे बिंग नाशिक व मालेगावात फुटले आणि दोन आरोपींसह एका विधी
.
मालेगावात फुटले बिंग
वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव हा सहा महिन्यांपासून भाड्याने राहात होता. त्याने धनराज धोटे, राहुल आंबटकर आणि एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने चलनात बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला होता. ऑनलाईन कागद खरेदी करून लहान मुद्रण यंत्राच्या मदतीने या नोटा तयार केल्या जात होत्या.
या बनावट नोटा बाहेरच्या जिल्ह्यातील आठवडी बाजारात चलनात आणण्यासाठी आरोपी धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांना नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले. तेथेच त्यांचे बिंग फुटले आणि मालेगाव पोलिसांनी त्या दोघांना पकडले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी वर्ध्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती दिली.
वर्ध्यात पोलिसांची कारवाई
मालेगाव पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी तीन पथके तयार करून गोंड प्लॉट परिसरात रात्री उशिरा (१२:३० वाजता) छापा टाकला.
छाप्यादरम्यान घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका भाडेकरूंच्या खोलीतून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १४४ बनावट ५०० रुपयांच्या नोटा (एकूण ७२,००० रुपये), प्रिंटर, विविध आकारांच्या लाकडी व काचेच्या फ्रेम, ए-४ साईज पेपर, इंक बॉटल आणि छपाईसाठी लागणारे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपी फरार, तपास सुरू
दरम्यान, साथीदार अटकेत गेल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव काही महत्त्वाचे पुरावे घेऊन फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. १६५५/२०२५) दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १७८(३)(४), १७९, १८०, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी जेरबंद झाल्यावर आणखी किती नोटा चलनात आल्या, याची माहिती मिळणार असल्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



