
डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी एक नवी माहिती उजेडात आली आहे. स्वतःच्या कष्टाने जे रुग्णालय नावारुपाला आणले त्या रुग्णालयात वळसंगकरांना केवळ ओपीडीचे अधिकार उरले होते. त्यांनी एखाद्या रुग्णाचे बिल कमी करण्याची सूचना केली तरी ते होत नव्हते. त्यां
.
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची सून न्यूरोसर्जन होती. त्यामुळे त्यांच्याकडेच जास्त रुग्ण येत होते. त्यांचे शिक्षणही जास्त होते. दुसरीकडे, वळसंगकर यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन यांचे रुग्णही स्वतंत्र येत होते. प्रत्येक आपापल्या रुग्णांचे बिल स्वतंत्रपणेच घेत होते. माझ्याकडे केवळ वेल्फेअरसंबंधीचे निर्णय होते. रुग्णालयाला काही वस्तू आवश्यक असल्यास डॉक्टर शिरीष यांच्या स्वाक्षरीने त्या मागवल्या जात होत्या, असे मनीषा यांनी पोलिस चौकशीत सांगितले आहे.
निम्मे अधिकार देऊनही सून होती नाराज
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर शिरीश यांनी आपली सून डॉक्टर शोनाली यांना रुग्णालयाचे निम्मे अधिकार दिले होते. त्यानंतरही त्यांना वळसंगकरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता. गत काही दिवसांपासून सून व मुलामधील वाद वाढला होता. त्याचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये, तोटा होऊ नये, रुग्णसंख्या रोडावू नये म्हणून मोठ्या डॉक्टरांची रुग्णालयात ये-जा वाढली होती. पण त्यांचा हस्तक्षेप सून व मुलगा या दोघांनाही आवडत नव्हता. काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन व डॉक्टर शोनाली हे नुकतेच एकत्र आले होते, असेही त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या माहितीनंतर आता पोलिस वळसंगकरांच्या सीडीआरमधून (कॉल डिटेल्स) काहीतरी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, सुसाईड नोटवरील हस्ताक्षर व स्वाक्षरी देखील या प्रकरणी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याद्वारे वळसंगकर यांच्या आत्महत्येला मनीषा की अन्य कुणी कारणीभूत आहे हे स्पष्ट होणार आहे.
डॉक्टर वळसंगकर यांचे सुपुत्र डॉक्टर अश्विन.
सुसाईड नोटवरील स्वाक्षरी वळसंगकरांचीच आहे का?
डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली सुसाईड नोट त्यांच्याच हस्ताक्षरातील आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातून डॉक्टरांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी असलेली काही दस्तऐवज जप्त केली आहेत. या दस्तऐवजावरील हस्ताक्षर व स्वाक्षरी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर व स्वाक्षरीशी जुळवून पाहिली जाणार आहे. त्यासाठी हे दस्तऐवज तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहेत. त्याचा रिपोर्ट पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडे एप्रिलचे कॉल डिटेल्स
पोलिसांनी वळसंगकरांनी 1 ते 17 एप्रिल या काळात कुणाकुणाला फोन केले? त्यांना कुणाचे फोन आले? व त्यांनी सतत कुणाला फोन केले होते का? किंवा त्यांना कुणाचे सतत फोन आले होते? अनोळखी क्रमांकावरून कुणाचे फोन आले होते का? याची माहिती घेतली आहे. याशिवाय मनीषाने स्वतःच्या मोबाईलवरून डॉक्टरांना महिन्याभरात किती फोन केले? याचाही डेटा पोलिसांनी मिळवला आहे. डॉक्टरांचे घर व दवाखान्यातील 30 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहे. विशेषतः पोलिस या काळात वळसंगकरांना घरी कोण-कोण भेटण्यास आले त्याचा धुंडाळा घेत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.