
Palghar Crime News: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांच्या आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे. आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देविदास परशुराम नावळे इयत्ता दहावी राहणार मूळचा मोखाडा बीवळपाडा आणि मनोज सिताराम वड इयत्ता नववी राहणार दापटी या दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शाळेचा सुरक्षारक्षक शाळेच्या मागच्या बाजुला गस्त घालत असताना त्यांना झाडाला काहीतरी लटकत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी जवळ जावून पाहणी केली तेव्हा दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकांनी याबाबत तात्काळ मुख्यध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना याची माहिती दिली.
कपडे सुकवण्यासाठी असलेल्या रस्सीला गळफास घेतला असून मयत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय येण्याआधीच शाळा प्रशासनाने मृतदेह खाली उतरवल्याने कुटुंबीयांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. जव्हारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक आणि पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असलं तरी यामुळे संबंधित विभागांवर मात्र आता पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
विरारमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या इमारतीवरून दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणांची ओळख पटली असून श्याम सनद घोरई 20, व आदित्य रामसिंग 21 अशी त्यांची नावे असून ते नालासोपारा परिसरात राहणारे आहेत. विरारच्या बोळींज येथील सुपर होम या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दोघांचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.
FAQ
प्रश्न १: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात काय धक्कादायक घटना घडली आहे?
उत्तर: वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रश्न २: आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आणि माहिती काय आहे?
उत्तर: देविदास परशुराम नावळे (इयत्ता दहावी, मूळ मोखाडा बीवळपाडा) आणि मनोज सिताराम वड (इयत्ता नववी, दापटी) या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ते आश्रम शाळेत शिकत होते.
प्रश्न ३: ही घटना कशी उघडकीस आली?
उत्तर: बुधवारी रात्री जेवणानंतर शाळेचा सुरक्षारक्षक गस्त घालत असताना झाडाला काहीतरी लटकत असल्याचे दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर दोन विद्यार्थ्यांनी कपडे सुकवण्याच्या रस्सीला गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षकांनी तात्काळ मुख्याध्यापक, अधीक्षक आणि शिक्षकांना माहिती दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.