
Santosh Deshmukh Murder Case Ujjwal Nikam Argument In Court: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील सुनावणीसाठी आज सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्जवल निकम केज येथील जिल्हा व अतिरिक्त सेशन्स कोर्टामध्ये उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी असेल अस न्यायालयाने दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर सांगत सुनावणी पुढे ढकलली. अॅडव्हकेट उज्जवल निकम यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. उज्जवल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. कोर्टात उज्जवल निकम नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात…
वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली? या प्रश्नावर निकम काय म्हणाले?
खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम उज्जवल निकम यांनी सांगितला. कशापद्धतीने खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग होता हे सांगण्याबरोबरच खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम उज्जवल निकम यांनी कोर्टाला सांगितला. वाल्मिक कराडने खंडणी जगमित्र कार्यालयात मागीतल्याचं सरकारी वकीलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे का? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली? का असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला. यावर सरकारी वकिलांनी, वाल्मिकी कराडच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. आवाज ओळखण्यात आला आहे. 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते, असा जोरदार युक्तिवाद उज्जवल निकम यांनी केला.
मोबाईल डेटामधून महत्त्वाची माहिती उघड
8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथे हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेचे बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत, असं विष्णू चाटे म्हणाला. त्यावेळी त्याला कायमचा धडा शिकवा असं सांगितलं गेलं, असा दावा उज्जवल यांनी युक्तिवादात केला. तसेच या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानेच गाईड केले. तसं सीडीआरमधून (मोबाईलचा कॉल डेटा) समोर आलं आहे. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केला होता.
हॉटेल तिरंगा येथे बैठक
सुरवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेने मारहाण केली. 8 डिंसेबर ला नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे यासंदर्भात वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. यामध्ये गँग लिडर सुदर्शन घुले आहे. त्याला वाल्मिक कराडने गाईड केले, असं उज्जवल निकम म्हणाले. त्यांनी जवळपास अर्धा तासात आपला युक्तिवाद संपवला. या दरम्यान त्यांनी आरोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले.
वाल्मिची बाजू कोणी मांडली?
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना न्यायालयात आले होते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोप पत्र आरोपींच्या वकिलांना देण्यात आले. वाल्मिक कराडाकडून वकील विकास खाडे यांनी युक्तीवाद केला. तर उज्जवल निकम यांचे सहकारी म्हणून वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.