
Mumbai Underground Road Project: मुंबई व महानगरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. लवकरच प्रवाशांच्या सेवेत भुयारी मेट्रो दाखल होणार आहे. भुयारी मेट्रोमुळं वाहतूक कोंडी काहीअंशी कमी होणार आहे. इतकंच नव्हे तर, प्रशासनाकडून विविध प्रकल्पही हाती घेण्यात येत आहे. असाच एक प्रकल्प एमएमआरडीएकडून उभारण्याचा विचार करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबई ते बीकेसीत उभारण्यात येणार बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे. या प्रकल्पामुळं दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.
मुंबईत लोकसंख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. काही किमीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठीही तासनतास लागतात. मात्र मुंबईतील जागेच्या कमतरतेमुळं रस्ते रुंदीकरणावर मर्यादा येत आहेत. इतकंच नव्हे तर उन्नत मार्गासाठी पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं प्रशासनाने यावर मार्ग काढण्यासाठी भुयारी मार्गाचा पर्याय सुचवला आहे. मात्र सध्या या प्रस्ताव विचारधीन आहे.
दक्षिण मुंबईपासून थेट बोरीवली आणि पूर्व उपनगरांपर्यंत हे जाळे विस्तारले जाणार आहे. त्यातून मुंबईत एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत थेट भुयारी मार्गातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दरम्यान बुलेट ट्रेन स्थानक सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सध्याचा मार्ग अपुरा पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत जलद प्रवासासाठी पहिल्या टप्प्यात वरळी येथे कोस्टल रोडचा शेवट तेथून पुढे बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा मानस आहे, तर पुढील टप्प्यात बीकेसी येथून पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
FAQ
1: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करत आहे?
उत्तर: मुंबई आणि इतर महानगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना हाती घेत आहे. यात लवकरच भुयारी मेट्रोचा समावेश होणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी काहीअंशी कमी होईल. तसेच, एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) विविध प्रकल्प उभारत आहे.
प्रश्न २: भुयारी मेट्रो प्रकल्पाबाबत सांगा?
उत्तर: भुयारी मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थेट भुयारी मार्गातून प्रवास शक्य होईल. दक्षिण मुंबईपासून बोरीवली आणि पूर्व उपनगरांपर्यंत हे जाळे विस्तारले जाणार आहे.
प्रश्न ३: एमएमआरडीएचा बुलेट ट्रेन स्थानक आणि विमानतळ जोडण्याचा प्रकल्प काय आहे?
उत्तर: दक्षिण मुंबई ते बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथील बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमले जाणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.