digital products downloads

विद्यार्थिनीची कॉलेजवरून उडी: मुंबईतील साठ्ये कॉलेजमधील घटना; हत्या की आत्महत्या? कुटुंबीयांचा मुलीला ढकलल्याचा आरोप – Mumbai News

विद्यार्थिनीची कॉलेजवरून उडी:  मुंबईतील साठ्ये कॉलेजमधील घटना; हत्या की आत्महत्या? कुटुंबीयांचा मुलीला ढकलल्याचा आरोप – Mumbai News


एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून स्वतःची जीवनायात्रा संपवल्याची दुःखद घटना मुंबईत घडली घडली आहे. सकृतदर्शनी ही घटना आत्महत्येची असल्याचा दावा केला जात आहे. पण विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईच्या विलेपार्ले भागातील साठ्ये कॉलेजमध्ये गुरूवारी सकाळी ही घटना घडली आहे. संध्या पाठक असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. संध्या ही साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आज सकाळी तिचा मृतदेह महाविद्यालयाच्या प्रांगणात इमारतीवरून पडल्याच्या स्थितीत आढळला. त्यानंतरच एकच खळबळ माजली. महाविद्यालय प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना तिचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे कळवले. पण हा आत्महत्येचा प्रकार असल्याची चर्चा साठ्ये कॉलेजमध्ये रंगली. सध्या विलेपार्ले पोलिस पुढील तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॉरिडोअरमधून जाताना दिसली

पोलिसांनी या प्रकरणी महाविद्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसून येत आहे. ती तेथून पडल्यानंतर तत्काळ तिला बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

दुसरीकडे, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, कुणीतरी तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही. तिला कुणीतरी पाठीमागून ढकलले असावे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस सर्वच अंगानी या घटनेचा तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp