
गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू अस आपण शिक्षकांना म्हणत असतो,या उक्तीला साजेसे काम परभणीच्या पालम तालुक्यातील गुंज जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षकांनी सुरू केलंय. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या बाराशे लोकवस्तीच्या गुंज या गावाचजे जागे अभावी छोटी छोटी तीन गाव झालीत. स्थलांतरीत झालेल एक गाव 2 किमी तर दुसर गाव 3 किमी दूर अंतरावल जाऊन वसलय. पण जिल्हा परिषदेची शाळा मात्र जुन्या गुंज गावातच आज ही आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना 2 ते तीन किमी दूर असलेल्या शाळेत नेऊन सोडावे लागत होते. यामुळे पालकांचा वेळ आणि इंधनात पैसा जात होता,ज्यांची परिस्थिती नाही अशा पालकांचे मुलं तर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जात होती. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटावरील संख्या कमी होत असल्याने या शाळेतील दोन शिक्षकांनी पालकांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरून शाळेत नेण्याचा आणि परत घरी सोडण्याची हमी घेतलीय, विद्यार्थ्यांना पिकअप आणि ड्रॉप करण्यासाठी शिक्षकांनी अस जुगाड केलंय,यामुळे आता पालकांची मुलं शाळेत ने आन करण्याची चिंता मिटलीय.
गावखेड्यात घरापासून दूर शाळेत जाणं हे विद्यार्थ्यांसाठी मोठं दिव्य असतं. यासाठी त्यांना वर्षाचे 12 महिने उन, वारा, पावसाचा त्रास सोसत वाट तुडवत शाळेत पोहोचावं लागतं. यावर परभणीतल्या एका गुरुजींनी काय उपाय शोधून काढला. बाईक ट्रॉलीतून तांड्यावरुन शाळेत निघालेले हे विद्यार्थी पाहा. या बाईकट्रॉलीचे चालक आहेत गुरुजी. परभणीच्या पालम तालुक्यातील गुंजच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ही बाईक ट्रॉली सेवा सुरु केलीय. गोदावरीच्या तिरावरील गुंज गावातल्या शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपिट करावी लागत होती. पायपिटीमुळं मुलं शाळाबाह्य होण्याची भीती होती. मुलांची शाळा बुडू नये म्हणून गुरुजींनी शक्कल लढवलीये. गुरुजी आता मुलांना बाईक ट्रॉलीतून शाळेत आणण्यासाठी जातात. आणि शाळा सुटल्यावर त्यांना घरीही सोडतात.
या शिक्षकांनी गुजरात येथून ट्रॉली मागवली,अर्थात यामध्ये गावकऱ्यांचा ही लोकसभाग आहेच, सदर ट्रॉली या शिक्षकाने स्वतःच्या बाईकला सेफ्टीपिन ने जोडून त्यातून या मुलांची मोफत वाहतूक सुरू केलीय. शिवाय ही ट्रॉली अपघातग्रस्त होऊ नये म्हणून ट्रॉली तयार करतांनाच ट्रॉलीची उंची कमी करण्यात आली असून ट्रॉलीची साडे तीन बाय पाच असा चौरस आकार बनवण्यात आलाय,यामुळे ही ट्रॉली वाहतूक करण्यासाठी सुरक्षित आहे. तरी सुद्धा अतिशय कमी स्पीडमध्ये शिक्षक दुचाकी हाकुन सुरक्षित रित्या विद्यार्थ्यांना शाळेत ने आन करीत असतात. त्यांच्या या उपक्रमशील प्रयोगामुळे शाळेत 8 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन वाढले असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले विद्यार्थी सुद्धा या शाळेत परत येत असल्याचे शिक्षक सांगतायेत.
गुरुजींच्या या संकल्पनेला गावातील पालकांनीही हातभार लावलाय. या संकल्पनेमुळं शाळाबाह्य होऊ शकणा-या मुलांची शाळा सुरळीत सुरु झालीये. एवढंच नाहीतर शाळेत काही विद्यार्थीही वाढल्याचं गावकरी सांगतात. मुलांना शिकता यावं असा एकच ध्यास या शिक्षकांनी घेतलाय. असाच ध्यास राज्यातल्या प्रत्येक झेडपी शाळेतल्या शिक्षकांनी घेतल्यास शिक्षणाचा दर्जाही उंचावेल. शिवाय पटसंख्येअभावी मराठी शाळांना टाळंही लागणार नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.