
विद्यार्थ्यांनो चिकाटी, जिद्द, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, यश नक्की मिळेल, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचालित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ. एस. आर. लोखंडे, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रिस्टोयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी, नीरज चोप्रा या खेळाडूंनी कठोर परिश्रम करून सराव आणि सातत्य यांच्या जोरावर जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिकाचे अहवाल वाचन प्रा. राजशेखर पवार, मनीषा शिंदे, भीम सोनकांबळे, सोनाली कटकधोंड व सौरभ भस्मे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. गुणवंत शिक्षक आणि महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्याविद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करताना मान्यवर. लोखंडे यांनी केले. तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल झिंगाडे भस्मे यांनी केले, आभार प्रा. भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शरणय्या मसुती, बसवराज कामाठी, प्राची गणेचारी, डॉ. बाळासाहेब पाटील, मधुबाला लोणारी, शीतल फुटाणे, हर्षदा गायकवाड, विद्याश्री वाले यांनी प्रयत्न केले.
कल्याणशेट्टी महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी प्रियंका गोंडाळ हिने एम. कॉम.च्या परीक्षेत ७९.६७ टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने तिचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




