
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
.
राजुरा, बोरी, वाई, येनस या गावांतील विद्यार्थ्यांना दररोज बाहेरगावी जाण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. राजुरा परिसरातून येनस मार्गे सकाळी सहा-साडेसहा वाजता नांदगाव खंडेश्वरला जाण्यासाठी बस सेवा नाही. सायंकाळी पाच वाजता नांदगाव-येनस-राजुरा-टोंगलाबाद मार्गावरही बस सेवा उपलब्ध नाही.
कंझरा मार्गे नांदगाववरून येणारी बस प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. राजुरा परिसरातील शेकडो विद्यार्थी ऑटोरिक्षातून प्रवास करत आहेत. अनेक लहान विद्यार्थ्यांना पहाटेच निघावे लागते.
शिंदे सेनेचे धामणगाव विधानसभेचे युवा प्रमुख राहुल हजारे यांच्यासह शुभम यावलकर, हेमंत बावनकुळे, संकेत गिरटकर, मुन्ना मेश्राम, गणेश शेबे, वैभव शेंड, समीर देशमुख आणि आदित्य कारमोरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. खाजगी वाहनांतून होणाऱ्या प्रवासात काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.