
आज विधानभवनाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जिंतेद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर बोलतांना विधानसभा अध्यक्ष राहु
.
नार्वेकर म्हणाले -या हाणामारीच्या घटनेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. माझ्या अधिकारात सुद्धा जे अधिकार आहेत, त्यानुसार मी कारवाई करणार आहे. विधिमंडळात अशी हिंसक कृत्य होऊ देणार नाही, यासाठी कारवाई करावीच लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी
या घटनेबद्दल गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पडळकर म्हणाले- विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पडळकर यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच, माझ्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी अधिक प्रतिक्रिया देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाने आज तीव्र रूप धारण केले. या दोन्ही नेत्यांचे समर्थक आज सायंकाळी थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडले. यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे विधिमंडळाच्या लॉबीत असणाऱ्या आमदारांत एकच घबराट पसरली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गत आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणाबाजी केली होती. यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांत चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर आज पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली. या घटनेचे आज विधानभवनाच्या लॉबीत तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत भिडले. त्यांच्यात कपडे फाटेपर्यंत जोरदार हाणामारी झाली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार व पत्रकारांत एकच खळबळ माजली. हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले. या घटनेत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याची माहिती आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे. विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो. त्यामुळे या दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. तसेच यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्षांना केल्याचे त्यांनी सांगितले. विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही. म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केली.
हाणामारी करणाऱ्या गुंडांसह त्यांच्या पोषिंद्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
झाला प्रकार अतिशय गंभीर आहे. विधानभवनासारख्या वास्तूचे पावित्र जपले पाहिजे. त्यांचे वाद वैयक्तिक असतील तर ते बाहेर झाले पाहिजे. पण विधानभवनात गुंड आणणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी पास दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असेही ठाकरे यावेळी आवर्जुन म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.