
Jayant Patil On Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदना देणारी ठरली. 28 जानेवारी दिवासाच्या सुरुवातीलाच दु:खद बातमी कानावर पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. या वृत्तानंतर बारामतीसह राज्यावर शोककळा पसरली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘विमान एअरस्ट्रीप सोडून कसे गेले?’
विमान एअरस्ट्रीप सोडून कसे गेले? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. टेक्नीकल फॉल्ट होता का? याबाबतची माहिती ब्लैक बॉक्समधुन मिळेल, असे ते म्हणाले. एअर स्ट्रिप उंच आहे. भराव करुन एक्सटेन्शन केलेली एअरस्ट्रीप आहे. त्यामुळे पायलटचा अंदाज चुकला असावा, असे जयंत पाटील म्हणाले.
माझ्या माहितीप्रमाणे अपघातावेळी धुके नव्हते. याच विमानानं अजितदादा आदल्या दिवशी प्रवास करत होते, त्यामुळे वैमानिकाला एअरस्ट्रीप नवीन नव्हती, असेही जयंत पाटील म्हणाले. यात कोणता घातपात नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पुन्हा एकसंघ व्हावे ही दादांची इच्छा
अजित दादांमध्ये जिद्द होती. मेहनत घ्यायचेअलिकडच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूका लढवाव्यात अशी चर्चा झाली. अनेक प्रसंग असेत की विसरता येणार नाहीत. माझ्या वेषभूषेबद्दल ते कायम टिप्पण्णी करायचे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपण पुन्हा एकसंघ व्हावे ही दादांची इच्छा होती, त्याच्या बैठकाही नुकत्याच झाल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी सांगितले.
अपघात एअरस्ट्रीप सोडून का गेलं? असा प्रश्न उपस्थित करत खासगी विमानाच्या सुरक्षेचा, तपासणीचा प्रोटोकॉल पाळला गेला पाहीजे असेही ते म्हणाले. हा घातपात दिसत नसल्याचेही ते म्हणाले.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
”आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरकं केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली. सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



