
विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारमधील तिघांची तोंडं तीन वेगवेगळ्या दिशांना आहेत. राज्यकारभाराचा समन्वयच हरवला असून जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत.
.
अंबादास दानवे म्हणाले की, विरोधकांची आज बैठक झाली या मविआचे सर्व नेते हजर होतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला असून आम्हाला निमंत्रण दिले आहे. चहापानाचे निमंत्रण दिलेले असताना राज्यातील सगळी परिस्थिती आता पाहिली तर कायदा सुव्यवस्थेची स्थिती, वाढलेला भ्रष्टाचार असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील याचा विचार केला तर तिघांचे 3 बाजूला तोंडं झाले आहेत. एक मंत्री नारायण राणेंबद्दल म्हणतात की त्यांनी अनेक मर्डर केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे बबनराव लोणीकर सारखे आमदार हे जनतेला म्हणतात तुमच्या पायातील चप्पल, अंगावरील कपडे हे सरकारने दिले आहे. म्हणजे ही ब्रिटीशांची सुधारित औलाद आहे. असे वक्तव्य करणारे भ्रष्ट्राचारात गुंतलेले सरकारमध्ये संजय शिरसाट असो संदीपान भुमरे यांचे प्रकरण समोर येत आहे. हिंदी सक्तीचा विषयानंतर तर सरकारच्या चहापानाला जाने आम्हाला संयुक्तिक वाटत नाही. एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणा करत आहे. तर दुसरीकडे राज्यात 3 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. यावर आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार आहे.
सत्ताधारी गुन्हेगारांना पोलिसांचे संरक्षण
अंबादास दानवे म्हणाले की, सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे लोकं वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत. पुण्यातील हगवणे प्रकरण आपण पाहिले. ठाण्यात खुनाचे प्रकरण आपण पाहिले. सत्ताधारी लोकं गुन्ह्यात सहभागी होत आहे पोलिसांचे त्यांना संरक्षण आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सर्व गोष्टीला प्रोत्साहन देत आहे.
हे वृत्त आपण अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.