
महायुती सरकार बॅकफूटवर गेले होते म्हणून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढला. पण औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यातील हवा विरोधकांनी काढली म्हणून नागपूरची दंगल घडविण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, औरंगजेबाच्या वंशजाच्या मजारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी का फुलं वाहत आहे. यावर राणे बोलणार नाहीत. त्यांना दिलेल्या टास्कवरच ते काम करतात. राणेंना जुहीमधील बंगला वाचवण्यासाठी आणि त्यांची पापे लपवण्यासाठी भाजपमध्ये जावे लागले, असेही त्यांनी म्हटले आहे. काल सभागृहात जो थयथयाट होता तो सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता. भाजपला असे का करावे लागतो? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
नेमके अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाले पण त्यांच्याकडे दाखवण्यासारखे एकही काम नाही. उलट ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले ते घोटाळे पाहिले तर ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे समोर आले आहेत. यातच धनंजय मुंडेंचा राजीनामा, जयकुमार गोरेंचे प्रकरण असो की माणिकराव कोकाटेंची सदस्यता यामुळे हे सरकार बॅकफूटवर गेले आहे. या सरकारला नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला, परंतू कबरीवर बोलणारे नीतेश राणे यांना माहिती पाहिजे की रंगून येथे औरंगजेबाच्या वंशजाच्या मजारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी का फुलं वाहत आहे. यावर राणे बोलणार नाहीत.राणेंना जेवढे काम दिले आहे तेवढेच ते करतील.
सुर्यवंशी प्रकरणी पोलिसांवर कारवाई नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी जो अहवाल आला आहे त्यात सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अजून कारवाई झालेली नाही.
मराठवाड्यात मराठा VS ओबीसी वाद
सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या की, सरकारने 100 दिवसांमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेला नाही. या प्रकरणाच देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या लोकांनी जो तपास केला आहे, तो तपास बघता तब्बल 3 महिने एवढे क्रौर्य उरात दडवून ठेवणे आणि सर्व माहिती हाताशी असताना एक राजकीय अजेंडा मराठवाड्यात राबवत मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. यामुळे भाजप बॅकफूटवर गेले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.