
Nanded Crime: नांदेडमध्ये विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही घटना घडली आहे. मुलीला आणि तिच्या प्रियकराला पाय बांधून विहिरीत फेकण्यात आलं होतं. यामुळो दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे.
विवाहित मुलीला भेटण्यासाठी आलेला तिच्या प्रियकराची आणि मुलीची हत्या करून दोघांचे मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील रहिवाशी असलेल्या 19 वर्षीय संजीवनी कमळे आणि 17 वर्षीय लखन भंडारे याचे प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी संजीवनीचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत लावून देण्यात आला होता. लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या.
सोमवारी लखन संजीवनीला भेटायला गोळेगाव येथे आला होता. दोघांना एकत्र पकडल्यानंतर सासरच्या मंडळींनी संजीवनीच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं. नातेवाईकांनी गोळेगाव येथे येऊन दोघांना बेदम मारहाण करून हातापायाला दोरी बांधून मृतदेह बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तीन आरोपीना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
FAQ
1) भारतात खुनाची शिक्षा काय आहे?
भारतात, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302 अंतर्गत, खुनाला जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, गुन्ह्याच्या तीव्रतेवर आणि परिस्थितीवर अवलंबून.
2) खून आणि मनुष्यवध यात काय फरक आहे?
मनुष्यवध हा एक व्यापक शब्द आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मृत्यू समाविष्ट आहे, मग तो कायदेशीर असो वा बेकायदेशीर, अपघाती असो वा हेतुपुरस्सर. खून हा मनुष्यवधाचा एक विशिष्ट प्रकार आहे जो बेकायदेशीर आणि हेतुपुरस्सर असतो
3) खुनाचे प्रकार कोणते आहेत?
– नियोजित आणि हेतुपुरस्सर खून
– हेतुपुरस्सर परंतु नियोजित नसलेला खून
– गंभीर गुन्ह्यादरम्यान झालेला खून
खून हा हेतू आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागला जातो, जसे की: प्रथम-श्रेणी खून (नियोजित), द्वितीय-श्रेणी खून (नियोजित नसलेला), आणि गुन्हेगारी खून (इतर गुन्ह्यादरम्यान).
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.