
कुंभमेळयापूर्वी पाैराेहित्यातील काैशल्य विकासासाठी वेद, हाेम हवन अभ्यासक्रम तीन महिन्यांत सुरू करु, अशी माहिती काैशल्यविकास व उद्याेजकता मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी दिली. ‘दिव्य मराठी’ नाशिक कार्यालयाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दहा दिवस दहा मं
.
नाशिक- त्र्यंबकमध्ये हाेणाऱ्या कुंभमेळ्यात पर्यटन, हाॅस्पिटॅलिटी आणि वेदिक या क्षेत्रांमध्ये काैशल्य विकासासाठी संधी आहे. त्यातही याेग्य पुराेहितांची आवश्यकता लक्षात घेता अल्प मुदतीचे ‘वेद- हाेम हवन’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती काैशल्यविकास व उद्याेजकता मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी दिली. ‘दिव्य मराठी’ नाशिक कार्यालयाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमास उपस्थित राहून त्यांनी उद्याेग, शिक्षण व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांशी साधलेला हा संवाद…
अहिल्याबाई हाेळकर स्टार्टअप याेजनेद्वारे नवसंकल्पना विकास
सरकारने रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार आणि नवसंकल्पना व संशाेधनाला चालना देण्यासाठी अहिल्याबाई हाेळकर स्टार्टअप योजना आणली आहे. उद्याेग व शिक्षित तरुणांच्या समन्वयासाठी रोजगार मेळावे घेतले जात आहेत. राज्यात दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त तरुण-तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांसाठी आचार्य शालेय कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहेत. तंत्रशिक्षण देणाऱ्या ज्या महाविद्यालयांमध्ये संबंधित तज्ज्ञ आहेत, त्यांना आम्ही परवानगी देताे. उपलब्ध सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची यादीही आमच्या विभागातर्फे केली जात असल्याचे लाेढा म्हणाले.
छाेटे सर्टिफिकेशन काेर्स सुरू करून राेजगारनिर्मिती करण्यावर भर देणार महाराष्ट्रात कौशल्य विकास क्षेत्रात अनेक एनजीओ कार्य करत आहेत. त्यांच्या सहकार्याने एकाच माध्यमातून कौशल्य विकासाला मदत देण्यासाठी सर्वच क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांना पुढाकार घ्यावा लागेल. अशा संस्थांची यादी दिल्यास आम्ही त्यांच्यासाेबत संपर्क साधून चांगले अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देऊ. शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी छाेटे सर्टिफिकेशन कोर्सेस चालू करून त्यांना राेजगार लगेच मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण ते तयार करीत आहाेत. नाशिकमध्येही राेजगाराची आगामी दाेन ते पाच वर्षांमधील स्थिती, मनुष्यबळाची मागणी याचा विचार करून आयटीआय किंवा तत्सम प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव आल्यास त्याला मान्यता दिली जाईल. परदेशात शिक्षणासाठी जर्मन, फ्रेंच भाषांचे ज्ञानही आवश्यक असते, ते भाषाकाैशल्य विकसित करण्यासाठीही आम्ही प्राधान्य देत आहाेत.
‘दिव्य मराठी’ नाशिक कार्यालयाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमास उपस्थित राहून मंत्री मंगलप्रभात यांनी , शिक्षण व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला.
सचिन उषा विलास जाेशी. शिक्षणतज्ज्ञ, इस्पॅलिअर स्कूल
प्रश्न : नाशिकमध्ये तंत्रकाैशल्य विकासाचे शिक्षण आणि सुमारे ३४ टक्के ग्रीन काॅलर नाेकऱ्या यासंदर्भात काय करता येईल? मंगलप्रभात लाेढा यांचे उत्तर : टेक्नाॅलाॅजी स्किल डेव्हलमेंटमध्ये नाशिकमध्ये तुमची आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षण, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देऊ शकताे. इच्छुक संस्थांची यादी मिळाल्यास विभाग त्यांच्याशी संपर्क साधेल. आयटी क्षेत्रातील ग्रीन काॅलर नाेकऱ्यांसाठी विकसित काैशल्यांकरिता ‘इम्प्रूव्हमेंट माॅडर्नायझेशन’ केले आहे. संधी असेल तेथे विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने प्रशिक्षण देऊ.
प्रशांत पाटील, प्राचार्य, केटीएचएम
प्रश्न : ट्रायबल एज्युकेशनसाठी सरकारने काय प्रयत्न केले आहेत? लहान अभ्यासक्रमांसाठी नाेंदणी साेपी कशी करता येईल? उत्तर : नाशिक, नंदुरबार व गडचिराेलीत ट्रायबल स्किलिंग सेंटर सुरू केली आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सतर्फे पाेर्ट डेव्हलपमेंट व पालघरमध्ये लाॅजिस्टिक काेर्स सुरू आहेत. प्रशिक्षणासाठी जेएनपीटीसाेबत सामंजस्य करारही केला जाईल. जीएसटी टॅक्स प्रॅक्टिससाठी नाेंदणी, परीक्षा ही पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारित आहे. त्यासह शासकीय अभ्यासक्रमांची नाेंदणी प्रक्रिया सहज, साेपी केली जाईल.
शंकर शिंदे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स प्रश्न : उद्याेग आणि शेती या क्षेत्रांमध्ये काैशल्य विकासासाठी शासनाला प्रस्ताव दिला. त्यातून काय सहकार्य हाेऊ शकेल? उत्तर : महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. काैशल्य विकासाचे प्रस्ताव ज्या क्षेत्रातून आले त्यांना सहकार्य दिले आहे, ही एक ‘आेपन विंडाे’ आहे. तुम्ही क्षेत्र, ठिकाण, विषय निवडा. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याची संपूर्ण व्यवस्था सरकार करेल. एकदा निवड प्रक्रिया पूर्ण झाली की प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारू.
मिलिंद राजपूत. उद्याेजक प्रश्न : कुंभमेळा ही नाशिकमधील स्थानिक हस्तकला, कलाकाैशल्य जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी संधी आहे. त्याची प्रदर्शने हाेतील का? उत्तर : कुंभमेळ्यात पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रांबराेबरच पाैराेहित्य क्षेत्रातही चांगल्या संधी आहेत. अल्प मुदतीचा वेद- हाेम हवन अभ्यासक्रम सुरू करू. स्थानिक कारागिरांच्या काैशल्य प्रदर्शनासाठीही मदत केली जाईल.
विशाल जाेशी, औद्याेगिक प्रशिक्षण प्रश्न : रोजगाराच्या संधी लक्षात घेता ‘मॉडेल सेंटर ऑफ एक्सलन्स‘ किंवा टेक हब तयार व्हावेत, त्याकरिता शासन काय करणार आहे? उत्तर : ड्राेन,जीओएआय, एआय, ईव्ही, रोबोटिक्स व तत्सम तांत्रिक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची प्रचंड गरज आहे. हे अभ्यासक्रम विकसित करण्याबराेबरच प्रशिक्षणालाही काैशल्य विकास विभाग प्राधान्य देईल.
श्रीकांत पाटील, स्टार्टअप इंडिया मेंटाॅर. प्रश्न : नाशिक स्टार्टअप इकोसिस्टीम राज्यात चौथ्या स्थानी आहे. मात्र इन्क्युबेशन सेंटर कमी आहेत, ते वाढविण्यासाठी सहकार्य मिळेल का? उत्तर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्रत्येक कॉलेजमध्ये इन्क्युबेशन सेंटर अनिवार्य आहे. त्यात विद्यार्थ्यांना स्टार्टअप्सची स्थापना व कल्पना प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित करता येतील. त्याला अाम्ही निश्चितच सहकार्य करू.
राेजगारनिर्मिती करण्यावर भर देणार
- – तंत्रज्ञान काैशल्य विकासासाठी स्थानिक गरजांनुसार निर्णय
- – तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स मंजूर
- – राज्यात दरवर्षी एक लाख तरुणांना राेजगार देणार
- – औद्याेगिक क्षेत्राद्वारेच विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने प्रशिक्षण देण्याची याेजना
- – प्रशिक्षण क्षेत्रातील एनजीओंना शासनातर्फे सहकार्य करणार
- – राज्यात ठिकठिकाणी राेजगार मेळाव्यांचे आयाेजन
- – शिक्षणासाठी परदेशी भाषा काैशल्य विकास करण्यासाठीही उपक्रम.
- – जेएनपीटीसह लाॅजिस्टिक अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी करार.
- – ५०० काॅलेजमध्ये आचार्य काैशल्य विकास केंद्र
- – ०६ महिन्यांचे राेजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणार
- – ३४ टक्के ग्रीन काॅलर नाेकऱ्या; आयटी क्षेत्राचेही प्रशिक्षण देणार
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.