
वेलतुरा येथील मिरवणुकीत बँण्ड लावण्याच्या कारणावरून दोन गटात राडा, दगडफेकीत ८ ते १० जण जखमी, उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविले
.
सेनगाव तालुक्यातील वेलतुरा येथे दुर्गामुर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत बँण्ड लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये ८ ते १० जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलतुरा येथे आज रात्री दुर्गामुर्तीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी बॅण्ड लावण्याच्या कारणावरून दोन गटात वादाला तोंड फुटले. शाब्दीक चकमकीनंतर हाणामारीला सुरवात झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये ८ ते १० जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार राजू जाधव, कुंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटाला समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या सर्वांनाच उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बँण्ड लावण्याच्या कारणावरूनच हा वाद झा्ल्याचे सेनगाव पोलिसांनी सांगितले असून सध्या गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गावातील परिस्थिीत शांत व नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तर रात्री उशीरा दुर्गामुर्तीचे विसर्जन शांततेत पार पडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत दोन्ही गटांनी तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.