
खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे निलंबित नेते वैभव खेडेकर यांनी अखेर आज भाजपचा झेंडा हाती घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय दिशेबाबत सुरू असलेले सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संतोष नला
.
वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांची प्रतिमा होती. मनसेच्या संघटनेच्या बांधणीपासून ते स्थानिक प्रश्नांवर लढा देण्यापर्यंत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी वाढलेल्या संपर्कामुळे मनसेच्या नेतृत्वाचा रोष ओढवला.
भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू होताच मनसेने त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून निलंबित केले. त्या निर्णयानंतर खेडेकरांनी उघडपणे भाजपकडे झुकते माप दिले. पण त्यांच्या प्रवेशाचा निर्णय मात्र वारंवार पुढे ढकलला जात होता. त्यामुळे ‘भाजपने खेडेकरांना झुलवतंय का?’ असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला होता.
पक्षप्रवेश रखडल्यानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी
याआधी वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलला गेला होता. प्रत्येक वेळी काही ना काही कारणांमुळे समारंभ स्थगित होत होता, त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षप्रवेश पुढे ढकलल्यानंतर वैभव खेडेकरांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत भाजप नेत्यांची अनेकदा भेट घेतली. रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याशी झालेल्या चर्चांनंतर अखेर आज त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले वैभव खेडेकर?
भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखे नाही. तुम्ही माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी जरुर सांगेन. मात्र आज तो दिवस नाही, असे वैभव खेडेकर म्हणाले. माझ्या देवाने स्वत:पासून दूर केले, काही कारणे झाली असतील मात्र दुरावा निर्माण झाल्याने मला दुःख आहे, असेही ते म्हणाले.
आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्यावर भर असेल. मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती तयार झाली होती. ती आज थांबत असल्याचं दुःख आहे. मात्र, भाजपने देखील मला आपलेसे केलंय याचा आनंद वाटतो, असेही त्यांनी म्हटले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.