
वैष्णवी हगवणेचे बाळ तिच्या आई-वडीलांकडे पोहचले आहे. वैष्णवीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली या प्रकारे तपास सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ऑडिओ क्लिप, तिच्या कुटुंबियांकडे असलेली माहिती, तिच्या अंगावर वळ यावर आधारि
.
दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ कुठे आहे हा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला होता. हे बाळ नीलेश चव्हाणकडे असल्याचे समोर आले होते. वारंवार बाळाची मागणी केली असता नीलेश चव्हाण हे बंदुकीला हात लाऊन इथून चालते व्हा, असा दम भरायचे. परंतु आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा ताबा मिळवला आहे. आता हे बाळ वैष्णवीच्या घरच्यांकडे म्हणजे कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे, यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आता बाळ त्यांच्या आजी अजोबाकडे असल्याचे स्पष्ट केले.
देशाच्या विरोधात जाणाऱ्याला सोडणार नाही
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, ज्योती मल्होत्राच्या केसमध्ये व्हाईट कॉलर असल्याचे भासवत लोक कसे देशद्रोह करतात हे दिसून येत आहे. तिने कुठे-कुठे रेकी केली हे आता समोर येत आहे. अशी रेकी अजून कुणी केली का हे शोधले जात आहे. देशाच्या विरोधात जो पण व्यक्ती जाईल आम्ही त्यांना सोडणार नाही. पोलिस-एनआयए चौकशीत माहिती समोर येत असून अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पाकसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राने मुंबईचा 4 वेळा दौरा केल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. ज्योती मल्होत्राने पाक अधिकारी दानिशच्या सूचनेनुसार पाकचा दौरा केला होता. त्यामुळे तिने मुंबईतील आपल्या प्रवास वर्णनाची माहिती पाकला पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले आहे.
धुळे प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधीमंडळाची कोणतीही समिती कुठे जात असेल आणि त्यांच्यावर प्रश्न निर्माण होत असतील तर आमचे कर्तव्य आहे की दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. म्हणून आम्ही धुळे शासकीय विश्रामगृह प्रकरणी एसआयटी स्थापण करत तपास करणार आहोत. याबद्दल विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींना एक समिती बनवून या सर्व गोष्टीचा तपास करावा अशी मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होईल तिथे कारवाई केली जाईल. धुळे-नंदुरबार दौऱ्यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीला खुश करण्यासाठी ‘वर्गणी’ जमा करून ती रक्कम समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या नावे बुक असलेल्या विश्रामगृहातील खोलीत ठेवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यानंतर बुधवारी रात्री 12 वाजता प्रशासनाची यंत्रणा हलली. गुलमोहोर विश्रामगृहातील कक्ष क्र.102 मधील ही रक्कम मोजण्यासाठी नोटा मोजणी यंत्र मागवावे लागले. पण, नेमकी किती रक्कम सापडली, याबाबत प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले. या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी हे वक्तव्य केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.