
Rajendra Hagawane CCTV: जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी सूनेचा मानसिक आणि शारिरीक छळ करुन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा राजेंद्र हगवणे याला अखेर अटक करण्यात आली आहे. सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी चार्जशीटमध्ये खूनाचा संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज पहाटे 4.30 वाजता दोघांना पोलिसांनी अटक केली.
सरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र आणि सुशील हगवणे याला अटक करण्यात आली. दरम्यान अटकेआधीचा राजेंद्र हगवणेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सूनेचा मृत्यू झालेला असताना सासरा मात्र मटणावर ताव मारत होता.
मटण सुक्का, तांबडा-पांढरा रस्सा, मटण रस्सा, भाकरी, बिर्याणी
16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. मात्र राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा याठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला. हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता.
परंतु 17 मे रोजी ज्या ठिकाणी हगवणे जेवायला बसला होता त्या रूमला आता बंद ठेवण्यात आलं आहे. ही रूम का बंद करण्यात आली आहे याचं उत्तर या हॉटेल मधील एकाही स्टाफकडे नाही. याशिवाय हगवणे याठिकाणी आला त्याविषयी माहिती देण्यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.
हॉटेल मालक मोहन भेगडे यांच्याशी झी 24 तासच्या प्रतिनिधीकडून फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आता या हॉटेल मालकाने देखील त्यांना या प्रकरणी मदत केली का असा सवाल उपस्थित होत आहे.
28 मेपर्यंत पोलीस कोठडी
अटक केल्यानंतर आज हगवणे बाप-लेकाला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.