
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवारी (दि.१३) काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक एलपीजी गॅस वापराचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या आदेशानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात खाद्य व्यावसायिक, हॉटेल चालक व कॅटरिंग व्यावसायिकांची शनिवारी (दि.१३) आढावा बैठक झाली. हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, मंत्रीमहोदय देशात गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायावर गॅस पुरवठ्याचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे व्यवसायिकांना अडचणी येत आहेत. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करत हॉटेल व खाद्य व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या निर्णयाचा राज्य सरकारने विचार केला नाही तर आगामी दिवसात अकोल्यातील ५०% हॉटेल व्यवसाय बंद होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या संदर्भात सोमवारी (दि.१६) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्स संचालकांची गॅसबाबतची समस्या सोडवण्याची विनंती करण्यात येणार आहे, असे हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, ओमप्रकाश गोयंका, कृष्णकुमार राठी, भावेश खिलोसिया, श्रीराम पांडे, जसपाल सिंग नागरा, प्रशांत देशमुख, बार असोसिएशनचे श्रीकांत देशमुख, विवेक मंत्री, डॉ. मनोज अग्रवाल, बोनी भाई शहा, पिंट्टु सेठ गोसावी, संजय सिसोदिया, गुड्डू ठाकूर, दिपक वोरा, भूषण मेहता, ईश्वर जैन, आनंद अग्रवाल, सागर अमानकर, हर्षल भांबेरे, रविभाऊ घाटे, गजानन खंडेलवाल, धनूभाई खिलौसिया, अश्विन भाई खिलौसिया, यश मेहता आदींसह हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्स संचालक उपस्थित होते. बैठकीला उपस्थित हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्च, कॅटरर्स व्यावसायिक. काही प्रमाणात प्राधान्य यादीत समावेश करा ^शासनाच्या परिपत्रकानुसार व्यावसायिक सिलिंडर वितरणात हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्सना प्राधान्य क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. यामुळे खाद्य व्यवसाय संकटात आला आहे. शासनाने टक्केवारीनुसार काही प्रमाणात प्राधान्य यादीत समावेश करुन न्याय द्यावा. – योगेश अग्रवाल, अध्यक्ष, अकोला हॉटेल असोसिएशन.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



