digital products downloads

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?: त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत – Mumbai News

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:  त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत – Mumbai News



शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात? किंवा आम्ही कोण आहोत? आम्ही जे आहोत ते ठाकरेंमुळे आहोत आणि ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिला. तेच नसते तर आम्ही काय होतो? बारामतीमध्ये शरद पवार हे लक्षात घ्या. पवार म्हणजे शरद पवार, दुसरे कोणी नाही पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आज तुम्हाला मोदी आणि शहा यांनी कोणालाही उभे केले असेल, पण शरद पवार नसते किंवा त्यांनी बारामती उभी केली नसती तर त्या पुढच्या कोणत्याही पवारांना महाराष्ट्रात कोणतेच स्थान मिळाले नसते. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली नसती आणि कष्ट केले नसते तर आम्हाला सगळ्यांना या राज्यात काहीच करता आले नसते. त्यामुळे माणसाने किमान कृतघ्नता ही ठेवावी. पवार म्हणजे शरद पवार, पवार म्हणजे दुसरे कोणी नाही. त्यांचीच पुण्याई आहे, बारामतीसह सर्वत्र. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही ही निवडणूक आपण अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करणार असे तटकरे म्हणत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. पण सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असतील तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांची निवड करतात की काय असे मला यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. 15 तारखेला दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक संजय राऊत म्हणाले, डिलीमिटेशन संदर्भात 15 तारखेला विरोधी पक्षाची बैठक दिल्लीत आहे. त्यापूर्वी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, हा सर्वानुमते घेण्याचा निर्णय आहे. फक्त मोदी यांनी निर्णय घेतला असे होणार नाही. तसेच मतदार संघाची पुनर्रचना ज्या पद्धतीने भाजपला करायची आहे, ते लोकशाहीसाठी धोकादयी आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp