
Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगडच्या संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेडसिग्नल दाखवला आहे. बाबाजानी दुर्राणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असताना बाबाजानी दुर्राणींविरोधात शिवसेनेनं मोहीम उघडलीये. बाबाजानी दुर्राणींनी आमदार असताना केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
बाबाजानी दुर्राणीं यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत. पाथरी नगरपरिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं ताबा, सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी, गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल प्रकरणात माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचं नाव, अनधिकृत टॉवरमधील गाळे भाड्यानं दिल्याचा आरोप, याआधीही एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी झाली. जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा समितीचा अहवाल, अहवालानंतरही अनधिकृत बांधकामावर कारवाई नाही असे अनेक आरोप आहेत.
बाबा टॉवरप्रकरणासह अनेक प्रकरणांच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करण्यात आली. या तक्रारींवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दरम्यानच्या काळात बाबाजानी दुर्राणींनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केलीय. या घोषणेनंतर शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून विधिमंडळात घोषणा झालेल्या एसआयटी चौकशीचं काय झालं असा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख नानाभाऊ टाकळकर यांनी विचारलाय.
अजितदादा मात्र शिवसेनेच्या या आरोपांना फारसं महत्व देत नसल्याचं दिसतंय. बाबाजानींवर खूप जण आरोप करतायेत. त्यांच्या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या आरोपांना केराची टोपली दाखवलीये.
वरवर हा पाथर्डी आणि परभणीचा संघर्ष वाटत असला तरी तसं नाहीये. सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष रायगडमध्ये पाहायला मिळाला, याच संघर्षाचा दुसरा अंक परभणीत सुरु असल्याची चर्चा या निमित्तानं सुरु झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.