
Rohit Pawar ED Raid : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. ईडीनं आमदार रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. राज्य सहकारी बँक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ईडीनं यापूर्वी देखील रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले होते. दरम्यान यावेळी ईडीकडून बारामती अॅग्रोची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. मात्र, ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र डागलंय.. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी असं ट्विट त्यांनी केले आहे.
रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी सरकारला सवाल केलाय.. अजितदादांविरोधातील पुराव्याचे काय झालं? असा सवाल करत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय. संजय राऊतांनी देखील सरकारवर हल्लाबोल केलाय. सरकारमधील मंत्र्यांवर देखील ईडीची कारवाई सुरू होती. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल का केलं नाही? असा प्रश्नन राऊतांकडून उपस्थित करण्यात आला. तर भुजबळांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय. कोर्टाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतरही काही लोक पाठिमागे लागतात असं विधान भुजबळांनी केलंय.. एवढंच नव्हे तर भुजबळांनी रोहित पवारांना एक सल्ला देखील दिला आहे..
नेमकं प्रकरण काय?
मार्च 2023 मध्ये ईडीने 50.20
कोटी रुपयांची बारामती अॅग्रोची
मालमत्ता जप्त केली होती.
यात 161.30 एकर जमीन, साखर
कारखाना, त्यातील मशीनरी आणि
इमारत यांचा समावेश आहे.
ही सगळी मालमत्ता कन्नडमधील आहे.
कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती
अॅग्रोने खरेदी केला होता.
हा कारखाना कमी किंमतीत खरेदी
केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक
गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा
दाखल केला होता.
राज्य सहकारी बँकेचे अधिकारी, संचालकांनी
सहकारी कारखाने त्यांच्या नातेवाईकांना
कमी किंमतीत विकल्याचा आरोप
दरम्यान याच प्रकरणात रोहित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. रोहित पवारांची याआधीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र, पवारांविरोधात पुरवणी आरोपत्र दाखल केल्यानंतर राजकारण तापलंय.. मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात नेमका कोणता निर्णय घेतं याकडे आता सर्वांचच लक्ष लागल आहे.
रोहित पवार यांनी काय ट्विट केलयं
कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात #ED
ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक
सांगण्याची गरज नाही. #ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे
धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता
आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईलच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे… महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे!
#सत्यमेवजयते
#जय_संविधान
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.