
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तु
.
जळगाव येथे समता परिषदेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी शक्तिप्रदर्शन केले. समता परिषदेतून भुजबळ यांनी राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दौऱ्याचे नियोजन केले आहे. या मेळाव्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी उपरोक्त मिश्किल टिप्पणी केली.
नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले की, यासंदर्भात पंचांग वगैरे बघतो. मी आता जळगावमध्ये आलो आहे. इथं चांगले ज्योतिषी आहेत. त्यांना विचारतो, असं होईल का? असा प्रश्न करतो. हे दोन्ही नेते एकत्र येतील की नाही मला माहीत नाही, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
अजितदादा-जयंत पाटलांनी चर्चा केली तर काय बिघडले?
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा करतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे.
भुजबळांनी पक्षश्रेष्ठींचे टोचले कान
आमचा पक्ष एक नंबर होत असेल तर निश्चितच चांगले आहे. पण एक नंबर पक्ष करण्यासाठी काय काय करावे लागते, हे लक्षात घ्यावे लागेल. राज्यात या ज्या गोष्टी घडत आहेत, त्या तात्काळ थांबवाव्या लागतील. भाजपचे आमदार सव्वाशे पेक्षा जास्त झालेले आहेत आणि ते वाढतच चालले आहेत. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचे आहे याचा विचार करूनच काम केले पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी एकप्रकारे पक्षश्रेष्ठींचे कान टोचले.
…म्हणून फडणवीसांनी मला बैठकीला बोलावले नसेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळासंदर्भात बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीला छगन भुजबळ यांना बोलावले नव्हते. यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. बैठकीबद्दल मला काही माहीत नाही. मी थोड्या वेळा पूर्वी एकले. आज ते नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणार आहेत. मला जर बोलावले असते तर सगळ्या आमदारांना बोलवावे लागले असते.
त्यांना त्या ठिकाणी पाहणी करायची असेल, अधिकाऱ्यांनी काय काम केले या संदर्भात माहिती घ्यायची असेल, त्यानुसार ते सर्वांचा आढावा घेतील आणि भविष्यात कोणत्या मार्गाने जायचे ते ठरवतील. त्यानंतर ते सर्व लोकप्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावतील. मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकीला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. नाशिकसाठी कोणी चांगला निर्णय घेतला, तर आम्हाला निश्चितच आनंद आहे. मला ते बोलवतील नंतर. मात्र जे बोलायचे ते मी अधिवेशनातच बोललो आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.