
Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना काल मराठा आंदोलकांनी घेराव घातला. जरांगे पाटलांना भेटून परतत असताना त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावरून सत्ताधारी नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपचा समाचार घेतलाय.
आझाद मैदानावर जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळेंना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी शरद पवारांविरोधात घोषणाबाजी झाली. त्यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष आजही शरद पवारांना प्रश्न करतो, असा टोला सुळेंनी लगावला. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुळेंना प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय.
जरांगेंच्या आंदोलनात शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपाचा आमदार शशिकांत शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला हे आरोप सिध्द करावेत असं आवाहन शशिकांत शिंदेंनी सत्ताधा-यांना दिलंय. उगाच लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करायचं बंद करा, अशी विनंती शिंदेंनी सरकारला केलीय.
दरम्यान, राज्यातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी जाऊन जरांगेंची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली होती. यावेळी सुळेंना मात्र मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सुळे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नाही तर काहींनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. सुप्रिया सुळे तिथं पोहोचताच शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला. आता या सगळ्या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. काही तरुणांच्या भावना तीव्र असतात अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय.
मराठा आंदोलकांनी थेट शरद पवारांवर आरोप केलेत. त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत…मात्र आरक्षणावर तोडगा कधी आणि कसा निघणार असा सवाल आता विचारला जात आहे.
FAQ :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना काय प्रत्युत्तर दिले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर देताना विचारले की, जेव्हा तुम्ही (शरद पवार आणि त्यांचा पक्ष) सत्तेत होता तेव्हा मराठा समाजासाठी काय केले? त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले, परंतु कोणताही निर्णय कायदेशीर आणि संवैधानिक चौकटीतच घेतला जाईल.
आझाद मैदानावरील आंदोलनाची सध्याची स्थिती काय आहे?
मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईच्या आझाद मैदानावर अनिश्चितकालीन उपोषण करत आहेत. आंदोलनाचा चौथा दिवस (1 सप्टेंबर 2025) उजाडला असून, त्यांनी सोमवारपासून पाणीही न पिण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो मराठा आंदोलक त्यांच्या समर्थनासाठी आझाद मैदानावर जमले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनात सुप्रिया सुळे यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले?
मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार (एनसीपी-एसपी) च्या खासदार सुप्रिया सुळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.