
मुकुंदवाडी पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे १ किलो ४०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांचे व्यसन तरुण पिढीचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत असताना ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात
.
मोहंमद मुजम्मील मोहंमद नजीर (२१), लोमान नोमन खान इरफान खान (२१, दोघे रा. रहेमान कॉलनी), मोहंमद लईखुदीन मोहंमद मिराजजोद्दीन (२५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अश्फाक (१९, रा. कटकट गेट) आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन (४५, रा. अंबिकानगर, गल्ली क्र. ८) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती एसीपी मनीष कल्याणकर यांनी रविवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबिकानगर येथे आरोपी महिला शेख सुलताना ही राठोड नामक व्यक्तीच्या घरात पहिल्या मजल्यावर ९ बाय १० च्या खोलीत भाड्याने राहते. ती रुग्णाची सुश्रुषा करते. तिचा मुलगा वाहनचालक म्हणून काम करतो. दरम्यान, तिच्या घरात अमली पदार्थांचा साठा असून तो काही आरोपी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी एपीआय संजय बहुरे, पीएसआय शिवाजी घोरपडे, जमादार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, वैराळकर, अनिल थोरे, गणेश वाघ यांच्या पथकाने फॉरेन्सिकच्या पथकासह छापा मारला. रूमचा दरवाजा बराच वेळ आरोपी उघडत नव्हते. अखेर दार उघडल्यानंतर आत पाहणी केली तेव्हा पलंगाखाली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चरस मिळून आले. कारवाईत पोलिसांनी १ किलो ४३९ ग्रॅम चरस जप्त केले. चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सुलताना हिला रविवारी दुपारी अटक केल्याचे पोलिस निरीक्षक इंगोले यांनी सांगितले.
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर शहराच्या शैक्षणिक परिसरात ड्रग्जचा विळखा वाढत असल्याचे समोर आले आहे. सिटी चौक पोलिसांनी एका तरुणाला १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज अटक केली. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडे ११ वाजता मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील पार्किंग गेट आणि होमगार्ड मैदानाजवळ ही कारवाई करण्यात आली. शेख आमेर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पार्किंग गेटजवळ आणि होमगार्ड मैदानाजवळ काही आमेर जवळ संशयास्पद पाकिटे आढळली. तात्काळ पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला बोलावले. तपासणीत ती पाकिटे एमडी ड्रग्सची असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे. महाविद्यालयाच्या परिसरात अशाप्रकारे ड्रग्जचा साठा सापडल्याने याचा पुरवठा विद्यार्थ्यांना केला जात असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शैक्षणिक संस्थांच्या जवळ असे प्रकार घडत असल्याने पालक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
उच्च प्रतीचा चरस असून आरोपींनी ते छोट्या छोट्या तुकड्यांत करून काही चरस दोन प्लेटमध्ये ठेवले होते. ते त्याची तोळा, ग्रॅममध्ये पुड्या तयार करण्याची तयारी करत होते. एक तोळा चरस ८०० ते १००० रुपयांत विक्री करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ लाख रुपये किमतीचे एवढे चरस आरोपींनी आणले कुठून याचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी किराडपुरा, बायजीपुरा भाग सोडून आता मुकुंदवाडीत भाड्याच्या खोलीतून नशेचा धंदा सुरू केल्याचे समोर आले आहे. यातील मोहंमद मुजम्मिल हा जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे, तर हे सर्वजण पहिल्यांदाच एनडीपीएसच्या कारवाईत सापडले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.