
Mumbai School Crime News: मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शिक्षिकेने मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आल्यानंतर तिच्याविरोघात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पालकांनाही बसला धक्का
शिक्षकांना, गुरूंना आपल्याकडे देवासमान दर्जा दिला येतो. मात्र शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अत्यंत लांछनास्पद कृत्य केलं आहे. पालक आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा फार विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने केलेल्या कृत्यामुळे पालकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार
याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. ही शिक्षिका गेल्या वर्षभरापासून पीडित अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती असा आरोप करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे ही शिक्षिका शहरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या मुलाला नेऊन त्याचं लैंगिक शोषण करत होती. हे प्रकरण समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला असून शाळेत एकच खळबळ माजली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
त्याला ती औषधंही देत होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणत त्याला इतके दिवस गप्प बसण्यास भाग पाडलं. एवढंच नव्हे तर आरोपी शिक्षिका विद्यार्थ्याला नैराश्य दूर करण्यासाठी औषधे देत असल्याचंही समोर आलं आहे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमी झाल्याचं उघड झालं आहे. पीडित विद्यार्थी सर्वांना घाबरुन राहत असे. मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने तो त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता.
अनेकदा केला लैंगिक अत्याचार
आरोपी शिक्षिकेने अल्पवयीन मुलाबरोबर अनेकदा घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपी शिक्षिका ही शाळेत शिकवायची. शाळेचे तास भरल्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेघळ्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याचं शोषण करायची.
परीक्षेनंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला
अखेर बराच काळ सगळं सहन केल्यानंतर, अखेर त्या विद्यार्थ्याने बारावीची (12वी बोर्ड) परीक्षा दिली आणि त्याने पालकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा त्याचं लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रमच विद्यार्थ्याने पालकांसमोर कथन केला.
पालकांची पोलिसात धाव
विद्यार्थ्याने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पीडित मुलाचे पालक हादरले. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.