
हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून सायंकाळच्या वेळी रुग्णालय मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून मोकाट जनावरामुळे अनुचीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
.
हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दररोज किमान ५०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी काही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावे लागते तर काही रुग्णांवर औषधोपचार करून घरी पाठविले जाते. रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. शासकिय रुग्णालयाचे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडे हस्तांतरण केल्यानंतर पुरेशी आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र हि अपेक्षा फोल ठरू लागली असून रुग्णालयाची वेळ सकाळी नऊ वाजण्याची असतांना वैद्यकिय अधिकारी मात्र दहा वाजता येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना डॉक्टरांची वाट पहात ताटकळत बसावे लागत आहे.
दरम्यान, रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना गणवेश असतांनाही कर्मचारी गणवेश परिधान करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी कोण अन रुग्णांचे नातेवाईक कोण हे लक्षात येणे कठीण होऊ लागले आहेत.
याशिवाय रुग्णालयाच्या परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. सायंकाळच्या वेळी मोकाट जनावरे रुग्णालयाच्या परिसरात येऊ बसतात. यामध्ये प्रामुख्याने गाय, बैल, कुत्रे या प्राण्यांचा समावेश आहे. एखाद्या वेळी या मोकाट जनावरांमुळे अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट जनावरांमुळे रुग्णांचे नातेवाईक देखील त्रस्त झाले आहेत. शासकिय रुग्णालय परिसरातील मोकाट जनावरांना आवर घालण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांतून केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.