
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील आज लातूरच्या दौऱ्यावर आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत काय चर्चा झाली? याचा तपशील समोर आला नाही. पण माध्यमांपुढे बोलताना
.
मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. यासाठी ते विविध जिल्ह्यांना भेट देऊन तेथील मराठा समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी गुरूवारी लातूरच्या मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी लातूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी त्यांच्यापुढे आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा जाहीर आरोप केला.
आमचा गैरसमज आता दूर झाला
मनोज जरांगे यावेळी सरनाईकांना उद्देशून म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला खवळून टाकले. त्यांनी एकाचेच (ओबीसी) काम करण्याची भाषा केली. तसेच आम्हाला पोलिस पाहून घेतील असा इशारा दिला. यामुळे मराठ्यांची लाट पुन्हा उसळली. मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांना (फडणवीस) नाकारता येणार नाही. ते एवढ्या लवकर उपकार विसरतील असे आम्हाला वाटत नव्हते. आम्ही 7 महिने शांत बसलो होतो. आम्ही त्यांच्याविरोधात एकही शब्द बोललो नाही. ते आम्हाला आरक्षण देतील असा आमचा गैरसमज होता. पण आता तो दूर झाला आहे.
मराठा समाजाची फसवणूक झाली हे आता आम्हाला समजले आहे. धनगर समाजाचीही अशीच फसवणूक झाली. ते आरक्षण देतो म्हणाले, पण दिले नाही. आमचेही तसेच झाले. लाडक्या बहिणींचेही तसेच झाले. शेतकऱ्यांचेही तसेच झाले. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. गरीब शेतकऱ्यांनी त्याची वाट पाहिली, पण अजून काहीच झाले नाही.
आम्ही त्यांचे वैरी नाही, पण असा खुणशीपणा चांगला नाही
मनोज जरांगे पुढे म्हणाले, कुणीही कुणाचीही फसवाफसवी करू नये. आम्ही काही त्यांचे वैरी नाहीत. विरोधक नाहीत. तु्म्ही मंत्री महोदय आहात. तुमच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवारांनाही हे ठावूक आहे. ते काही वैरी नाहीत, पण असा खुणशीपणा चांगला नाही. ही काय भाषा झाली? तुम्ही आमच्या महिलांवर पुन्हा आंतरवाली सराटीसारखा हल्ला करणार असा अर्थ आम्ही काढायचा का? संविधानावरील पदावर बसलेला माणूस असा कसा बोलू शकतो. एका जातीला असे धरणार आणि दुसऱ्या जातीला तसे धरणार असे कसे शक्य होऊ शकते.
तुमच्या आमच्याकडून ठीक आहे. आपण राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करतो. गरीब जनता जातीची भाषा करू शकतात, पण मुख्यमंत्रीच असे बोलत असल्यामुळे मराठ्यांना धक्का बसला. भाजपच्या लोकांनाही बसला आहे. भाजपचेही लोक मला फोन करून हा अवघडच खेळ झाल्याचे सांगतात. त्यांची मुले आता त्यांनाच आरक्षणाविषयी प्रश्न विचारत आहेत, असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा…
शिवसेनेचा फैसला पुढे ढकलला:सुप्रीम कोर्ट पक्ष, चिन्हावर करणार 8 ऑक्टोबर रोजी करणार सुनावणी; उद्धव ठाकरेंनी जोडले हात
मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाची लोकशाही सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर तडफडत असल्याचे आर्जव केले आहे. या प्रकरणी त्यांनी सुप्रीम कोर्टाला शिवसेना पक्ष व चिन्हाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. पण आता ही सुनावणी आता सुप्रीम कोर्टात 8 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची बाब समोर आली आहे. या सुनावणीत शिवसेनेचे बहुचर्चित प्रकरण हातावेगळे केले जाण्याची दाट शक्यता आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.