
Nashik Shivsena Meeting: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्र्र विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आजी-माजी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बैठक सुरू असतानाच बाचाबाची सुरू झाली त्यामुळं काही काळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना अहिल्यानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले बाबुशेठ टायरवाला यांच्यात वाद झाला. एकमेकांचे कार्यकर्तेदेखील बैठकीनंतर भिडल्याचे पाहायला मिळाले. दोन गट आपापसात भिडल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
नाशिकच्या हॉटेल एक्सप्रेस इन येथे शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मंत्री उदया सामंत, दादा भुसे आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे हॉटेलमध्ये उपस्थित असतानाच मोठा राडा झाला. दरम्यान कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ केल्याचा प्रकारदेखील समोर आला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक होती. मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणूकसंदर्भातदेखील चर्चा होणार असल्याचे समोर आले होते. या बैठकीसाठी अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक विभागातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
1) नाशिकमधील शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक कधी आणि कोठे झाली?
ही बैठक 11 ऑगस्ट 2025 रोजी नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित करण्यात आली होती.
2) या बैठकीचे उद्दिष्ट काय होते?
या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार) शिवसेना (शिंदे गट) च्या कामकाजाचा जिल्हानिहाय आढावा घेणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरविणे हे उद्दिष्ट होते.
3) बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?
बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.