
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घरात अघोरी पूजा केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन
.
भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांचे नेहमीच ऐकतात. त्यांच्याच हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली, असे ते म्हणाले होते. वसंत मोरे यांनी सोमवारी त्यांची ही टीका धुडकावून लावताना गोगावलेंवरच अघोरी पूजा केल्याचा आरोप केला. वसंत मोरे म्हणाले, भारत गोगावले यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. माझा गोगावले यांना प्रश्न आहे, त्यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी बगलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते? त्यांनी ज्या पूजा घातल्या होत्या, त्या कशाला घातल्या होत्या?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार
भरत गोगावले यांनी 11 पुजारी बोलावून त्यांच्याकडून कशाला पूजा केली होती? बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या. निवडणुकीआधी ओम फट स्वाहा करणाऱ्यांना आणले जातात. महाराष्ट्रातील अनेक नेते तिथे जातात. एका पूजेला तब्बल 15 लाख रुपये लागतात. गोगावलेंच्या घरात अशी पूजा होत असेल तर आम्ही निश्चितच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करू, असे मोरे म्हणाले.
वसंत मोरे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावरही भाष्य केले. महाराष्ट्रातील संपूर्ण मनसैनिक व शिवसैनिकांची दोन्ही सेना एकत्र याव्यात अशी इच्छा आहे. राज्यातील येत्या निवडणुकांत हा प्रयोग नक्कीच केला पाहिजे. शिवसेनेने या प्रकरणी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता येत्या गणेशोत्सवात याचा श्रीगणेशा झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
आता पाहू काय म्हणाले होते भरत गोगावले?
भरत गोगावले म्हणाले होते, रश्मी ठाकरे पडद्यामागून शिवसेनेत कायम हस्तक्षेप करायच्या. उद्धव ठाकरे यांच्या मनात काही विचार असायचे, पण ते नंतर बदलायचे. आम्ही कार्यकर्ते व पदाधिकारी उद्धव यांना भेटण्यासाठी गेलो तर आम्हाला त्यांची भेट मिळत नव्हता. आम्हाला परत यावे लागायचे. आमदारांनाच प्रवेश नव्हता तर कार्यकर्त्यांचे काय? हे सर्वांना दिसत होते. या सर्व घडामोडींमागे रश्मी वहिनी व त्यांचे नातेवाईक होते. त्यामुळे इच्छा असूनही उद्धव यांना काहीही करता येत नव्हते. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही स्त्री शक्तीचा आदर करतो. त्याबद्दल दुमत नाही. पण ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना काही चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, त्या न सांगितल्यामुळे हे सगळे घडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देऊ नका असे सर्वांचे म्हणणे होते. पण त्याचाही हट्ट धरला गेला. त्यानंतर हे सर्व रामायण – महाभारत घडलं, असे भरत गोगावले म्हणाले.
हे ही वाचा…
कुंडमळा दुर्घटनेचे खरे कारण समोर:दुचाकी चालकांचा वाद झाल्याने पुलावर झाली होती गर्दी; प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिली महत्वाची माहिती
पुणे – पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल कोसळून 4 जणांचा बळी गेला आहे. हा पूल वापरासाठी बंद होता. पण त्यानंतरही अचानक त्याच्यावर गर्दी झाल्यामुळे तो कोसळला. या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याचे खरे कारण समोर आले आहे. एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने दोन दुचाकी चालकांचा वाद व त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.