
8th Pay Commission Salary Hike: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच केंद्र सरकारला सादर केल्या जातील. नवीन वेतन आयोग एप्रिलपासून सुरु होईल. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासाठी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू असतील. आठव्या वेतन आयोगाचा सर्वात मोठा परिणाम महागाई भत्त्यावर होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य केला जाईल. नवीन वेतन आयोग लागू होताच महागाई भत्त्याची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होईल. या पार्श्वभूमीवर कोणाच्या पगारात वाढ होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आठव्या वेतन आयोग लवकर लागू व्हावा यासाठी सरकारी कर्मचारी वाट पाहत आहेत. मागील वेतन आयोगांची घोषणा आणि अंमलबजावणीमधील कालावधीतील अंतर लक्षात घेता, आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम केंद्र सरकार आणि त्यानंतर राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी तो लागू होईल.वेतन आयोग लागू होईल तेव्हा कॉन्स्टेबल, शिक्षक आणि सैन्यातील सैनिकांमध्ये कोणाचा पगार सर्वात जास्त वाढेल.
पगार कसा वाढेल?
कोणत्याही वेतन आयोगात पगार वाढण्यामागे फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा असतो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता आणि आता आठव्या वेतन आयोगात तो 2.86 पर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो 18 हजार रुपये आहे तो थेट 51 हजार 480 रुपये होईल.
पोलीस हवालदाराचा पगार किती वाढेल?
सातव्या वेतन आयोगानुसार उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये कॉन्स्टेबलचा मूळ पगार 21 हजार 700 रुपये प्रति महिना आहे. जर उत्तर प्रदेशात आठवा वेतन आयोग लागू झाला आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल तर यूपी पोलिस कॉन्स्टेबलचा मूळ पगार दरमहा 62 हजार 62 रुपये होईल. म्हणजे थेट 40 हजार रुपयांची वाढ.
शिक्षकांचा पगार किती वाढेल?
यूपीतील शिक्षकांचा पगार 9 हजार 300 रुपयांपासून सुरू होतो आणि 35 हजार 400 रुपयांपर्यंत जाते. हे मूळ वेतन सातव्या वेतन आयोगानुसार आहे. जर उत्तर प्रदेशात आठवा वेतन आयोग लागू झाला आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल, तर उत्तर प्रदेशातील शिक्षकांचा मूळ पगार 26 हजार 598 रुपयांवरून 1 लाख 1 हजार 244 रुपये होईल.
लष्करी जवानाचा पगार किती वाढेल?
सातव्या वेतन आयोगानुसार, भारतीय सैन्यातील सैनिकाचा मूळ पगार दरमहा 21 हजार 700 रुपये आहे. लष्करातील सैनिक केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये येतात. आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा प्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील. जर आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल तर लष्करी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 21 हजार 700 रुपयांवरून 51 हजार 480 रुपये होईल. लष्करी कर्मचाऱ्यांना भरपूर भत्ते देखील मिळतात म्हणजेच त्यांचा पगार आणखी वाढेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.