digital products downloads

शिर्डी साईमंदिरात दर अर्ध्या तासाने वेशांतर करून चोरी करणारी टोळी गजाआड

शिर्डी साईमंदिरात दर अर्ध्या तासाने वेशांतर करून चोरी करणारी टोळी गजाआड

Shirdi Mandir: शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कपडे बदलून आणि वेषांतर करून गर्दीत मिसळण्याची त्यांची पद्धत पाहून पोलिसही हैराण झाले. दर सुमारे 30 मिनिटांनी वेगळा पेहराव करून ते पुन्हा मंदिर परिसरात वावरत होते. या प्रकरणात 2 महिला, 1 पुरुष आणि 1 अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून महागड्या कंपनीचे 10 मोबाइल फोन, 1170 रुपये रोख रक्कम तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे ब्लेड आणि कटर जप्त करण्यात आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

सीसीटीव्हीतून उलगडले रहस्य

साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. त्यावेळी काही महिला आणि पुरुष संशयास्पद हालचाली करताना दिसले. तपासाची दिशा स्पष्ट होताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या कारवाईदरम्यान 1 आरोपी पसार झाला, मात्र उर्वरित 1 पुरुष, 2 महिला आणि 1 बालक पोलिसांच्या हाती लागले.

झडती घेतल्यावर आरोपींकडून 10 मोबाइल, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे अल्पवयीन बालकाकडूनही 1 मोबाइल सापडला. त्या बालकाला तत्काळ चिल्ड्रन होममध्ये पाठविण्यात आले आहे. या टोळीची कार्यपद्धती अत्यंत चलाख होती. सुरुवातीला महिलांनी पंजाबी ड्रेस परिधान केला होता, तर काही वेळाने साडी नेसून त्या पुन्हा गर्दीत मिसळत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले.

पोलिसांचे आव्हान वाढले

या प्रकरणाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी माहिती दिली की, मंदिर परिसरात सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे आणि फरार आरोपीचा शोध सुरू आहे. वेषांतर करून पोलिस आणि सुरक्षारक्षकांची दिशाभूल करण्याचा या टोळीचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला.

दररोज देश-विदेशातून हजारो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. आधीच परप्रांतीय भिक्षेकऱ्यांचा प्रश्न चर्चेत असताना आता चोरी करणाऱ्या टोळ्याही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी शिर्डी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp