
वज्रखेडा येथे स्वामी देवानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तदिवसीय विश्वकल्याणार्थ पंचकुंडात्मक श्री महारुद्र याग महायज्ञ व संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा महारुद्र याग महायज्ञ सोहळा १८ ते २५ एप्रिलदरम्यान आयोजित करण
.
या ठिकाणी पंचक्रोेशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दैनंदिन श्री महारुद्र महायज्ञ पूजन विधी दि. १९ एप्रिल शनिवारला श्री गणेश पूजन, कलश जलयाग, प्रायश्चित व यजमानाचे शुद्धीकरण, पंचांग कर्मपूजन व मंडळ स्थापना करण्यात आली.
दररोज ११ ते २ संगीतमय शिवमहापुराण कथा संतोष महाराज आढावणे हे करणार आहेत. दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४.३० ते ५.३० काकडा भजन, ११ ते २ संगीतमय शिवमहापुराण कथा, दुपारी ३ ते ६ महाप्रसाद पंगत, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ८.३० ते १०.३० महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होईल. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वज्रखेडा ग्रामस्थांनी केले आहे. हा महारुद्र याग महायज्ञ मंडप बनवण्यासाठी राजस्थान येथून गवती गवत व बांबूचा वापर करून घेतला आहे. मंडप बनवण्यासाठी २ लाख ४० हजार रुपये खर्च आलेला आहे.
आज महारुद्र हवन; उद्यापासून पूर्णाहुती
सोहळ्यात आज रविवार रोजी अग्निस्थापना, ग्रहशांती हवन, महारुद्र हवन प्रारंभ होणार आहे. सकाळी ७.३० ते १०.३०, दुपारी २.३० ते ५.३० प्रति दिवस दि. २० एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत राहील. दि. २५ एप्रिल रोजी पूर्णाहुती सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील.
मंडपामध्ये पाच अग्निकुंड लक्षवेधी
या महारुद्र याग महायज्ञासाठी एकूण पाच अग्निकुंड बनविण्यात आले आहे. हे अग्निकुंडाचे बांधकाम विटा आणि काळी व पांढरी माती वापरून केलेले आहे. शेणाने सारवून घेतलेले आहे. यामुळे खास तयार मंडपात हा महायज्ञ सुरू आहे.
पिंडीवर २१३ लिटर पंचामृताचा अभिषेक
१११ किलो गावरान गाईचे तूप, १११ किलो तीळ, ५१ किलो ज्वारी, ५१ किलो तांदूळ, ५१ किलो साखर, ११ टन समिधा साहित्य लागणार आहे. वज्रेश्वराच्या पिंडीवर पंचधातूचे आवरण घालण्यात येणार आहे. अभिषेक करण्यासाठी १०१ किलो दही, १०१ किलो दूध, ११ किलो मध लागणार आहे. २१३ लिटर पंचामृताचा अभिषेक आहे. हे पूजन इंदूर येथील अन्नपूर्ण आश्रमचे आचार्य श्री किशोर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा आयोजित करण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.